ताज्या घडामोडी

जिल्हा बँक आणि येवल्यातील संस्था कुणी बुडविल्या हे येवल्यापासून नाशिकपर्यंत सर्वांना चांगलेच माहित- मोहन शेलार,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस* *दराडेंनी स्वत:ला ओरिजनल

*जिल्हा बँक आणि येवल्यातील संस्था कुणी बुडविल्या हे येवल्यापासून नाशिकपर्यंत सर्वांना चांगलेच माहित- मोहन शेलार,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस*

*दराडेंनी स्वत:ला ओरिजनल शिवसैनिक म्हणून घेणे हा मोठा विनोदच – मोहन शेलार,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस*

*येवला,दि.२६ एप्रिल* :- जिल्हा बँक आणि येवल्यातील सहकारी संस्था या कुणी बुडविल्या हे येवल्यापासून ते नाशिक पर्यंत सर्वजण चांगलेच जाणून आहे. दराडे बंधूनी विविध बँका आणि सहकारी संस्था मोडकळीस काढण्यात किती योगदान दिल हे सर्वश्रुत असून ‘जनता सब जाणती है’ अशी जहरी टीका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

मोहन शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आमदार नरेंद्र दराडे यांनी भुजबळांबद्दल केलेले वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. येवलेकर जनता ही अतिशय सुज्ञ असून त्यांना दराडे बंधूची ख्याती चांगलीच माहिती आहे असा उपरोधी टोला त्यांनी लगावला आहे. दराडेंनी म्हटले आहे की, भुजबळांच्या आर्मस्ट्रॉग साखर कारखान्याने जिल्हा बँकेचे कर्ज थकविले. याबाबत दराडेंनी अभ्यास करून बोलण्याची गरज होती. कारण आर्मस्ट्रॉग साखर कारखान्यासाठी भुजबळांनी २० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ८ कोटी रुपये नियमित भरले. दरम्यानच्या काळात ईडीची कारवाई झाली. आणि ईडी ने हा साखर कारखाना अॅटॅच केल्यामुळे व्याजाची रक्कम वाढत गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुमारे १०० कोटी रुपयांची किंमत असलेल्या या कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेकडे गहाण आहे, त्यामुळे जिल्हा बँक आणि इतर बँका कुणी कशा बुडविल्या हे सर्व जनतेला माहित आहे. योग्य वेळ आल्यानंतर ते सर्व आम्ही जनतेसमोर मांडू अशी टीका त्यांनी केली.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, आमदार नरेंद्र दराडे यांनी भुजबळांना उद्देशून म्हटले की, मी ओरिजनल शिवसैनिक आहे, या वक्तव्याने हसू आवरेनासे झाले आहे. कारण ते भुजबळ साहेबांना सांगता आहे की, मी ओरिजनल शिवसैनिक आहे. हा तर मोठा विनोदच आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे येवलेकरांची चांगलीच करमणूक झाली. तसेच भुजबळांनी शेपटीवर पाय देऊ नये असे दराडे सांगतात मात्र याच दराडेंनी परवाच्या प्रचार सभेत भुजबळांना येवल्याच्या बाहेर काढू अशी शेखी मिरविली. मग आता कोण कोणाच्या शेपटीवर पाय देतय हे त्यांनी अगोदर समजून घ्यावे आणि मग विनोदी भाष्य माध्यमांमध्ये करावे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!