ताज्या घडामोडी

सहकारी संस्था बुडविणाऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदार घरी बसविल्याशिवाय राहणार नाही- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

*सहकारी संस्था बुडविणाऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदार घरी बसविल्याशिवाय राहणार नाही- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

*येवल्यातील सहकारी संस्था ओरबाडून खाणाऱ्यांना जनता संधी देणार नाही – छगन भुजबळ*

*सहकारी संस्था या ओरबाडून खाण्यासाठी नाही तर शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी ; छगन भुजबळ यांच्याकडून विरोधकांचा समाचार*

*शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार स्वार्थ नाही तर परमार्थ साधून शेतकऱ्यांची सेवा करतील – छगन भुजबळ*

*येवला,दि.२५ एप्रिल :-* येवल्यातील सहकारी संस्था ओरबाडून खाणाऱ्यांना जनता संधी देणार नाही. आपल्या शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार स्वार्थ नाही तर परमार्थ साधून शेतकऱ्यांची सेवा करतील. सर्व मतदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहून बहुमताने निवडून द्या असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ आज येवला येथील माऊली लॉन्स येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर,संभाजी पवार, अरुणमामा थोरात, विश्वासबापू आहेर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई,महेंद्र काले, समीर देशमुख, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मकरंद सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, गणपत कांदळकर, प्रवीण गायकवाड, राजेश भांडगे, राजाभाऊ लोणारी, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, संतोष खैरनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार किसनराव धनगे, वसंत पवार, संजय बनकर,रतन बोरनारे, अल्केश कासलीवाल, संजय पगार, सविता पवार, डॉ.मोहन शेलार, लता गायकवाड, पुष्पा शेळके, कांतीलाल साळवे, ॲड.बापू गायकवाड, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, सचिन आहेर, संध्या पगारे, नंदकिशोर अट्टल, सुरेश अट्टल, गोरख सुरासे उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मला जेव्हा येवल्यात आणल्या गेले तेव्हा अनेक कार्यकर्ते माझ्यासाठी मुंबईत आले होते. येवल्याच्या विकासासाठी मला इथ आणलं गेलं. येवल्यात काम करण्याची संधी असल्याने पवार साहेबांनी मला इथे पाठविले. येवल्याच्या विकासासाठी आपल्याला संधी दिली त्या येवल्याच्या विकासासाठी आपले अविरत प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सार्वजनिक पदावर सर्वांना संधी मिळाली पाहिजे. इतरांनी सांगितलेल्या वेळी राजीनामा दिला. मात्र यांनी दहा वर्ष सत्ता भोगली अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी माणिकराव शिंदे आणि दराडे बंधूंचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, या बंधूंनी बाजार समिती निवडणुकीत स्वतः एकानेही उमेदवारी केली नाही. त्यांनी उमेदवारी का केली नाही असा सवाल उपस्थित करत मर्चंट बँक, एनडीसीसी बँक कुणी बुडविली अशी सडकावून टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विकास कामांसाठी पैसा मिळाला नाही. मात्र उद्घव ठाकरेंच्या शिवसेनेच्या म्हणवणाऱ्या बंधूंना १०० कोटी कसे मिळाले असा सवाल उपस्थित करत हे तर ठाकरे गटाचे नाही अशी टीका करत जनता सब जानती है असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा महत्वाच्या कांद्याच्या प्रश्नावर पंधरा दिवस आपण सातत्याने आवाज उठविला. तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा आहे मग शेतकऱ्यांचा प्रश्न सभागृहात का नाही मांडला असा सवाल त्यांनी दराडे बंधूंना केला. तसेच आमदारकीला माझ्या विरोधात उभ राहून तुमची इच्छा पूर्ण करून घ्या असा टोलाही त्यांनी दराडे बंधूंना लगावला.

ते म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे त्या दृष्टीने शेतकरी विकास पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. या उमेदवारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे रहा त्यांना विजयी करा असे आवाहन करत सहकारी संस्था ओरबाडून खाणाऱ्यांना जनता संधी देणार नाही. येवला मर्चंट बँक, मजूर फेडरेशन निवडणुकीत विरोधकांना जनतेने घरचा रस्ता दाखविलेला आहे. या निवडणुकीतही जनता त्यांना घरचा रस्ता दाखविल अशी टीका त्यांनी केली.

यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार म्हणाले की, शेतकरी विकास पॅनल हे शेतकऱ्यांच्या हितासाठी कामे करेल कुठलाही संशय मनात न ठेवता संपूर्ण पॅनल निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अंबादास बनकर म्हणाले की, शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना अधिक फायदा करून देण्यासाठी सर्व उमेदवार प्रयत्न करतील. शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासोबत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मतदार बांधवांनी या शेतकरी विकास पॅनलच्या पाठीशी उभ रहावं असे आवाहन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!