ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा  रमेश बैस हे बुधवारी (दि. २६) नाशिक दौऱ्यावर

नाशिक :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा  रमेश बैस हे बुधवारी (दि. २६) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल पदाची सूत्रे घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपाल नाशिकला येणार असल्याने यंत्रणांकडून दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

    राज्यपाल रमेश बैस यांचे सकाळी १० वाजेच्या च्या आसपास त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाऊंडेशनच्या हॅलिपॅडवर आगमन होईल. तेथून राज्यपाल त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन नंतर तसेच पहिने (ता. त्र्यंबकेश्वर ) या गावाला ते भेट देतील.

      त्यानंतर राज्यपाल  बैस यांचे नाशिक शहरात आगमन होणार आहे. सर्वप्रथम कालिदास कलामंदिर येथे नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव सांगता समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तेथून सार्वजनिक वाचनालयाला ते भेट देतील. या भेटीनंतर पंचवटीमधील श्री काळाराम मंदिरात राज्यपाल दर्शन  घेतील. दुपारी तीन नंतर राज्यपाल बैस  हॅलिकॉप्टरने शिर्डीकडे प्रयाण करतील.

    राज्यपाल बैस हे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्यावेळी कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. शहरातील कार्यक्रमा वेळी राज्यपालांसमवेत व्यासपीठावर कोण- कोण उपस्थित राहणार येथपासून ते त्यांचा ताफा कोणत्या रस्त्याने जाणार यासंदर्भात सूक्ष्म स्तरावर प्रशासनकडून नियोजन केले जात आहे. त्यासाठी पोलीस व संबंधित यंत्रणांची मदत घेतली जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!