ताज्या घडामोडी

तांबापुरा परिसरात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

तांबापुरा परिसरात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून नेल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत बुधवार ७ डिसेंबर रोजी रात्री ८:०० वाजता एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तांबापुरा परिसरातील एका भागात अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे.
५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७:०० वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असता अज्ञात व्यक्तीने दिला काहीतरी आमीष दाखवत फूस लावून पळून नेले. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीच्या परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु मुलगी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी बुधवार ७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अध्यात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ८:०० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!