ताज्या घडामोडी

प्रतिनिधी. इर्शाद मुल्लाजि डीबीजे महाविद्यालय ते बहादूरशेख नाकापर्यंत रस्ता डांबरीकरणासाठी व्यापाऱ्यांचे आंदोलन*

प्रतिनिधी. इर्शाद मुल्लाजि
डीबीजे महाविद्यालय ते बहादूरशेख नाकापर्यंत रस्ता डांबरीकरणासाठी व्यापाऱ्यांचे आंदोलन*

चिपळूण, – मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना डीबीजे महाविद्यालय ते बहादूरशेख नाका या दरम्यानचा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा यासाठी येथील व्यापाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गा विभागाच्या येथील कार्यालयावर धडक दिली. सर्व्हिस रोडचे काम करताना त्याचा व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही तसेच काम करताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेवूनच काम होईल. असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून व्यापाऱ्यांना देण्यात आले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने व्यापाऱ करणाऱ्या लहान – मोठ्या व्यापाऱ्यांनी आज सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या विभागाच्या अधिकाऱ्यासह चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीच्या प्रमुखाशी चर्चा केली. यामध्ये नितीन लोकरे, अभिजित बापट, सुचित मोहिते, भूषण तांबे, मोहन चोचे, सुनिल कुलकर्णी, सागर महाडिक, मिलिंद मेहता, संजय गद्रे आदींचा समावेश होता. राम राठोड यांचा समावेश होता. गेली पाच वर्ष या भागातील नागरिक, लहान मोठे व्यापारी चौपदरीकरणाच्या नावाखाली भरडले जात आहेत. उडाणपुलाचे काम कसे करणार, दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम चांगले व्हायला हवे. नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्रास न देता कामे करा. सर्व्हिस रोड दिर्घकाळ टिकेल अशा पद्धतीने करा अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता प्रदिप निगडे आणि इगल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सकारात्मक उत्तर दिले. बहादूरशेख नाका ते डीबीजे महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल. उडाण पुलाच्या कामाचा व्यापाऱ्यांना होणार नाही.. सद्या पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे पत्र काढले जातील. नागरिक व व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल. कुणाला काहीही शंका असेल तर आमच्याशी संपर्क करा असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!