ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली.*

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली.*
सचिन वखारे, येवला.
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली देण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान शिक्षिका आलिया खान या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.यानंतर शिक्षक अमोल आहेर, सुस्मिता देशमुख, सोनाली साताळकर, प्रिंसिपल अल्ताफ खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आलिया खान यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी रविंद्र गायकवाड, अजहर खतीब, गणेश सोनवणे, दीपक खैरनार, अजीम पटेल, सचिन घोडके, अविनाश बोडारे, माधुरी माळी, सुनीता वडे, अर्चना एंडाईत, नीलिमा देशमुख, प्रतीक्षा चव्हाण, निदा फारुकी, सायली भालेराव, कल्याणी देशमुख, तरन्नुम सैय्यद, धनश्री काळंगे आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अजहर खतीब यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!