ताज्या घडामोडी

स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या संयुक्त कारवाई….

    नाशिक (वृत्तसेवा बबलू शेख ९१६८७३१३१३) – निफाड येथे कृषी विभाग, पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या संयुक्त कारवाईमध्ये येथे ३५ लाखाच्या संशयास्पद निम कोटेड युरीयाच्या ५० कि. ग्रॅ. च्या ४९३ गोण्या, निमकोटेड युरीयाच्या ४५ कि. ग्रॅमच्या ९ गोण्या, स्टीचींग मशिन, चंबल फर्टीलायझस, कृभको व झुआरी या ५२९ रिकाम्या गोण्या, ट्रक असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संशयीत व इतर २ जणांविरोधात खत नियंत्रण व जिवनावश्यक वस्तु कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    स्थानिक गुन्हे अन्वेषण नाशिक शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निफाड येथील रुद्राय हॅाटेल येथे ट्रक क्रमांक एम. एच. १८ बी. एच. १७८६ मध्ये हा युरीया आढळला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जगन सुर्यवंशी, सागर कोते, सहायक पोलिस निरीक्षक, नितेंद्र पानपाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग व बाळासाहेब खेडकर, कृषी अधिकारी पंचायत समिती निफाड यांच्या सहकार्याने ही कारवाई केली.

    Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!