ताज्या घडामोडी

येवल्यातील भुमीपुत्र महेंद्र पगारे यांचा कोल्हापूर येथे राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार 2022 देऊन गौरव करण्यात आला*

*येवल्यातील भुमीपुत्र महेंद्र पगारे यांचा कोल्हापूर येथे राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार 2022 देऊन गौरव करण्यात आला*

निर्मिती विचार मंच कोल्हापूर यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विविध अनमोल कार्य करणाऱ्या मान्यवरांना क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार 2022 देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य राजेखान शानेदिवाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मा.अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस माजी खासदार निवेदिता माने डाॅ सुरेश जाधव मा. विजया कांबळे मा. अनिल म्हमाने लेखक डाॅ. खंडेराव शिंदे उपस्थित होते त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध भागात शैक्षणिक व सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांना राजश्री शाहू महाराज यांच्या कर्मभूमीतील मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
या पुरस्कारासाठी 800 हुन अधिक प्रस्ताव आले असताना त्यात येवला तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते स्वारीपचे तालुकाध्यक्ष तसेच अनकुटे सावखेडे कार्यकारी सोसायटीचे चेअरमन महेंद्र पगारे यांची निवड जाहीर करून त्यांना कोल्हापूरी फेटा स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,5000हजार रू किंमतीचे 11 पुस्तकांचा संच जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, मा.खासदार निवेदिता माने व इतरमान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
श्री पगारे येवला तालुक्यातील अनकुटे या गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते फुले शाहु आंबेडकर चळवळीतील सक्रिय व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहे.ते येवला तालुक्यात महिला समुपदेशन केंद्र चालवतात त्यामाध्यमातून त्यांनी शेकडो महिलांना न्याय मिळवून दिला तर अबाल महिला,शेतकरी, गरीब,गरजू,कष्टकरी पिडीत शोषित लोकांसाठी अनेक मोर्चे,आंदोलने,उपोषणे करून झोपेचे सोंग पांघरलेल्या सरकारला जाग आणली व न्याय मिळवून दिला तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन गरीब होतकरू अनाथ बालकांना मदत करून भरीव कार्य केली त्यांच्या याच अनमोल कार्याची दखल घेऊन त्यांना श्रीपाल सबनीस,डॉ.राजेखान शानेदीबान,मा.खासदास निवेदिता माने आदी.मान्यवरांच्या हस्ते सदर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
श्री पगारे यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार मिळाल्याचे कळताच तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राजश्री शाहू महाराजांच्या पावन कोल्हापूर नगरीत सत्यशोधक पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे निर्मिती वाचनमंचने माझ्या कार्याचा केलेला सन्मान व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा मला प्रेरणादायी आहे. यासर्व बाबींमुळे माझी जबाबदारी अजूनच वाढली आहे.यापुढे ही मी जास्तीतजास्त समाज उपयोगी कार्य करीत राहील अशी भावना पुरस्कर्ते महेंद्र पगारे यांनी व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!