ताज्या घडामोडी

आय.एम.ए.संघटना व जनरल प्रॅक्टिशनर्स आयोजित मोफत तपासणी शिबीर संपन्न*

प्रतीनीधी शाहीद खान जळगाव.

एम.ए.संघटना व जनरल प्रॅक्टिशनर्स आयोजित मोफत तपासणी शिबीर संपन्न*

– विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 450 विद्यार्थ्यांची तपासणी

चाळीसगाव – शहरातील बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए.सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आय.एम.ए व जनरल प्रॅक्टिशनर्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैद्यकीय तपासणी शिबीर राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला, 450 विद्यार्थ्यांची यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रसंगी आय.एम.ए संघटनेचे अध्यक्ष डॉ.विनोद कोतकर, जनरल प्रॅक्टिशनर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ.महेश वाणी, सचिव डॉ.सुजित वाघ, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ.प्रकाश बाविस्कर, उपप्राचार्य डॉ.अजय काटे आदी उपस्थित होते.

तर शिबीर प्रसंगी डॉ.गिरीश मुंदडा, डॉ.सुभाष निकुंभ, डॉ.प्रविण भोकरे, डॉ.अभिमन्यू राठोड, डॉ.भरत सूतवणे, डॉ. प्रशांत शिनकर, डॉ.राहुल साळुंखे,डॉ.किरणकुमार मगर, डॉ.सुधन्वा कुलकर्णी, डॉ.शहाजी देशमुख, डॉ.हर्षल सोनवणे, डॉ.सौ.रोहिणी सूतवणे, डॉ.सौ.भाग्यश्री शिनकर आदीनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.

शिबीर यशस्वीतेसाठी प्रा.ए.आर.धांडे, प्रा.डॉ.जी.डी.राजपूत, प्रा.डॉ.दिपाली बन्सवाल, प्रा.डॉ.ए.डी.शेळके, प्रा.बी. एन.उंदीरवाडे, प्रा.एम.एस.पाटील, प्रा.ए.डी.सावरकर, आदी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!