ताज्या घडामोडी

बँकेच्या एटीमएमध्ये पैसे लोडिंग न करता ५५ लाख पन्नास हजार रुपयांचा मोठा अपहार दोनजण पोलिसांच्या ताब्यात*                          

 

 

प्रतिनिधी.. इर्शाद मुल्लाजी

बँकेच्या एटीमएमध्ये पैसे लोडिंग न करता ५५ लाख पन्नास हजार रुपयांचा मोठा अपहार

दोनजण पोलिसांच्या ताब्यात*                                                                                 बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेले 55 लाख  50 हजार  एटीएम मध्ये लोड न करता तिचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार दापोलीत घडला आहे. याप्रकरणी दोन संशयितावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनोल नाचरे व प्रथमेश शिर्के यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे.
याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड डोंबिवली या कंपनीकडे खेड व दापोली येथील बँकांच्या एटीएम मध्ये कॅश भरण्याचे काम आहे.  या कंपनीचे ऑपरेटर  अमोल अशोक नाचरे, रा. उंबर्ले, ता. दापोली व प्रथमेश विश्वनाथ शिर्के,रा. तळे, ता. खेड कर्मचारी आहेत, बँकेमधून कॅश घेऊन पैसे घेऊन ती एटीएम मशिनमध्ये लोडिंग करण्याचे काम हे दोघे कंपनीच्या वतीने दापोली व खेड विभागकरता देण्यात आले आहे.
11 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत अक्सिस बँकेच्या 3 व स्टेट बँकेच्या 2 एटीएम मध्ये भरण्यासाठी त्यांच्या कंपनीने दिलेले 55 लाख 50 हजार रुपये त्यांनी एटीएम मध्ये न भरता या रकमेचा अपहार केल्याची तक्रार कंपनीचे शाखा व्यवस्थापक देवेंद्र चुडे रा.नवीमुंबई घणसोली यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही रक्कम येथील बँकेकडून ताब्यात घेऊन ती एटीएम मध्ये लोड करायचे अत्यंत जबाबदरीचे व जोखमीचे काम या दोजणांकडे देण्यात आले होते. मात्र या दोघांनीही तब्बल ५५ लाख ५०हजार  इतकी मोठी रक्कम ताब्यात घेऊन ती एटिएमध्ये लोडींग  केली नाही त्यामुळे या रक्कमेच नेमके काय झाले या सगळ्या प्रकरणाची आता पोलिसांकडुन चौकशी सुरू करण्यात आहे. दापोली पोलीस ठाण्यात या दोन संशयितां विरोधात भादवि ४०८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा सगळा प्रकार ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत घडला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक निनाद कांबळे करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!