सुप्रीम कॉलनीत औषधी दुकानात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सुप्रीम कॉलनीत औषधी दुकानात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरी;
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात औषधी विक्रेत्याच्या दुकानातून एका चोरट्यांने सीसीटीव्ही कॅमेरा चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अजिमुद्दीन आरिफ पटेल, (वय-२९) रा. कोहिनूर चौक सुप्रीम कॉलनी जळगाव यांचे मेडिकल दुकान आहे. औषधी विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या दुकानात त्यांची १५०० शे रुपये किमतीच्या सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे. याच परिसरात राहणारा तय्यब इम्रान पटेल,(वय-२९) याने १५०० शे रुपये किंग तिच्या सीसीटीव्ही कॅमेरा हा चोरून नेला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर अजिमोद्दीन आरिफ पटेल यांनी शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाचता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरील संशयित आरोपी तय्यब इम्रान पटेल,( वय-२९) रा. सप्रेम कॉलनी आजच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.