कृषी व व्यापारग्रामीणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानराजकीयसंपादकीय

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये “राष्ट्रीय शिक्षण दिन” व “गुणवंतांचा सत्कार” कार्यक्रम संपन्न.*

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये “राष्ट्रीय शिक्षण दिन” व “गुणवंतांचा सत्कार” कार्यक्रम संपन्न.*
*अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसुल येथे “राष्ट्रीय शिक्षण दिन” व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, मा. सरपंच सौ. विनिता अमोल सोनवणे, रामनाथ काका एंडाईत, भागिनाथ थोरात हे होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन, “मौलाना अब्दुल कलाम आझाद” यांच्या प्रतिमेला पुष्पमाळ तसेच शिक्षण व सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. दि. ११ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले शिक्षणमंत्री, स्वातंत्र्य सैनिक आणि शिक्षणतज्ञ “मौलाना अब्दुल कलाम आझाद” यांच्या १३१ व्या जयंती निमित्त शाळेत “राष्ट्रीय शिक्षण दिन” साजरा करण्यात आला.तसेच महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे तर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचा अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळा तर्फे सत्कार करण्यात आला.पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे.*
*पुर्व उच्च प्राथमिक(इ.५वी) परीक्षा-*
*१) रूपेश दिगंबर सोनवणे.*
*२) प्रतिक्षा पृथ्वीराज देशमुख.*

*पूर्व माध्यमिक (इ.८वी) परीक्षा-*
*१) अनुराग सुदाम सोमासे*
*२) दिव्या बाळासाहेब सोनवणे*
*३) श्रद्धा रामेश्वर रनवरे*
*अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे यांनी सर्व संचालक मंडळ व शिक्षकांचे सहकार्याबद्दल कौतुक केले व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.*
*सदर कार्यक्रमास मनोहर सोनवणे, दिगंबर सोनवणे, पृथ्वीराज देशमुख, सुदाम सोमासे, बाळासाहेब सोनवणे, रामेश्वर रनवारे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, अझहर खतीब, गणेश सोनवणे, अमजद अन्सारी, गौरव सैंदाने, अजीम पटेल, मनीष सैंदाने, जयप्रकाश बागुल, माधुरी माळी, सुनीता वडे, चेतना माकूने, शर्मिला पवार, सुश्मिता देशमुख, आलिया खान, शोभा निकम, प्रिया भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल आहेर यांनी केले तर आभार दीपक खैरनार यांनी केले.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!