क्राईमताज्या घडामोडी

आम्हास न्यायालयातून निकाल नव्हे न्याय मिळायला पाहिजे – मुस्लिम महिला व पुरुषांची आर्त हाक

आम्हास न्यायालयातून निकाल नव्हे न्याय मिळायला पाहिजे – मुस्लिम महिला व पुरुषांची आर्त हाक

प्रतिनिधी शाहिद खान

नुकताच सुप्रीम कोर्टाने छावला रेप व मर्डर केस मधील तीन आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने जळगाव येथील मुस्लिम समाजातील महिला व पुरुषांनी एकत्रित येऊन महामहीम राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान व महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदनाद्वारे मागणी केली की न्यायालयात हल्ली निकाल मिळत आहे न्याय मिळत नाही जर अशा प्रकारे लोकशाहीचे स्तंभ एकापाठोपाठ विखरले जात असतील तर आम्ही महिलांनी कुठे जावे, काय करावे अशी आर्त हाक या मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे यांच्यामार्फत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडे केलेली आहे.

*केंद्र व राज्य शासनाला निवेदन*

जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख व महिला विभागाच्या प्रमुख नाझिया अहमद यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या मार्फत केंद्र व राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. यात केंद्र शासनाला निवेदनाद्वारे सुप्रीम कोर्टाच्या छावला रेप मर्डर केस मध्ये शासनाने त्वरित पूनर अवलोकन याचिका (रिव्ह्यू पीटिशन) दाखल करावी व हीचा निकाल लागेपर्यंत त्या तिघा आरोपींना सोडण्यात येऊ नये तसेच निर्भया ,असिफा, बिलकिस बानो च्या प्रकरणात ज्याप्रमाणे भारत सरकारने आपल्या मार्फत पाहिजे तशी कडक कारवाई न केल्याने आरोपी सुटले गेले त्यामुळे शासनाने याबाबत विचार करावा अशा तीन मागण्या केलेल्या आहेत.

राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे विनंती केली की महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्री महोदय, उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी व राजकीय नेते हे हल्ली आमच्या महिलांसोबत व महिलांच्या बाबत आक्षेपार्य विधाने, शिवीगाळ व चरित्र हननच्या गोष्टी करीत असल्याने त्या सर्व राजकीय नेत्यांच्या विरोधात त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी व महिलांचा होत असलेला अपमान थांबवावा अन्यथा आम्ही आमचा अराजकीय सर्व धर्मीय महिला व पुरुष रस्त्यावर येऊन त्या लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.

*शिष्टमंडळात यांचा होता समावेश*

सौ नाझिया एजाज, सौ फिरोजा शेख, समरीन शकील, सलमा सुलताना, अरबिया बशीर, मयेराज इकबाल, खदिजा सय्यद मुख्तार, मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, काँग्रेस आय चे प्रदेश सचिव बाबा देशमुख, शहराध्यक्ष मुजीब पटेल व कार्याध्यक्ष नदीम काझी, एमआयएमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख सय्यद सनेर, मुस्लिम सेवा संघाचे प्रादेशिक अध्यक्ष जहांगीर खान, शिकलगार बिरादरीचे अन्वर खान व मुजाहिद खान, युवा मणियार बीरादरीचे हरीश सय्यद, उस्मानिया कॉलनीचे समाजसेवक नाझीम सेंटर व समीर शेख, राष्ट्रवादीचे जुबेर खाटीक,शिवसेनेचे बंटी सय्यद ,समाजवादी चे मोयोद्दिन शेख, आदींची उपस्थिती होती.
फोटो
१) उप जिल्हाधिकारी सौ शुभांगी भारदे यांना निवेदन देताना सौ नझिया शेख सोबत फारुक शेख,सनेर सैयद,जहांगीर खान, आदी दिसत आहे
२) निवेदन दिल्यावर पत्रकारांना मुलाखत देताना नजिया शेख व फारुक शेख सोबत शिष्ट मंडल दिसत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!