ताज्या घडामोडी

सावदा इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे नविन फेरफार प्रकरण वादाच्या भोवऱ्यात?*

शाह नासीर सवदा

*सावदा इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे नविन फेरफार प्रकरण वादाच्या भोवऱ्यात?*

“जुन्या विश्वस्थांच्या जागी आपल्या मर्जीतील व जवळील नातेवाईकांचे नाव समाविष्ट करण्यासाठी अक्रम खान अमानुल्ला खान यांनी दाखल केलेला फेरफार प्रस्ताव संपूर्णपणे खोटा व चुकीचा असून स्वतःची मनमानी संस्थेत सुरू राहावी करीताचा कटकारस्थान आहे.तरी मिटिंग एजंडेवर प्रोसिडिंगवर माझी सही नसून या नविन फेरफार प्रस्तावस माझी संमती नाही.या विरुद्ध मी लवकरच कायदेशीर हरकत घेणार.अशी प्रतिक्रिया संस्था संचालक अ.अजीज अ.रशीद अंसारी यांनी पोलिस टाईम प्रतिनिधीला दिली.”
—————————————-
“दि.११/५/२०२२ रोजी संस्थेचे ज्या संचालकांच्या विरुद्ध सावदा पोलीस स्टेशन मध्ये फौ.गुन्हा दाखल झाल्याने ते सर्व आजपर्यंत अफरातफर आहे.या दरम्यान संस्था व शाळा कारभार चालवण्यासाठी खंड पडत होता.तरी संस्था व शाळा कारभार सुरळीत चालविले जावे.म्हणून मे.सहा.धर्मदाय आयुक्त जळगांव यांच्याकडे नाईलाजाने उपाध्यक्ष सलीम खान अ.ज्जाक खान व संचालक अ.अजीज अ.रशीद अन्सारी यांचे पद कायम ठेवून सदरचे नवीन फेरफार अर्ज मंजुरीसाठी सादर केलेले आहे.
अशी प्रतिक्रिया संस्थाचे सचिव अक्रम खान अमानुल्ला खान यांनी पोलिस टाईम प्रतिनिधीस दिली.”
—————————————-
सावदा प्रतिनिधी मोसिन शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी रजि.नं.एफ.१०८८ द्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल सावदा या शाळेत सन २०१२ ची शिक्षक भरती बोगस असल्याच्या कारणाखाली सावदा पोलिस स्टेशनात मे २०२२ मध्ये दाखल फौजदारी स्वरूपाच्या दखलपात्र गुन्ह्यात संस्थेचे एकूण ११ संचालक असून यापैकी ज्या ठराविक ६ संचालकांचे संशयित आरोपी म्हणून नाव आहे.त्या सर्वांचे नाव कमी करून संस्थेत त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील व जवळचे नातेवाईक वगैरे यांचे नाव संचालक म्हणून समाविष्ट करण्यासाठी सदर गुन्ह्यायाच्या सुरू असलेल्या तपास कामाच्या दरम्यानच अल्पमतात असलेले संस्थेचे विद्यमान अध्यक्ष,चेअरमन व एका संचालकाने मे २०२२ च्या सरतेशेवटी एक वार्षीक सर्वसाधारण सभा संस्थेच्या रेकार्डवर दाखवून तसा फेरफार प्रस्ताव दि.१० ऑगस्ट २०२२ रोजी सहा.धर्मदाय आयुक्त जळगांव यांच्या कडे मंजुरी मिळणेकरिता संचालक अक्रम खान अमानुल्ला खान यांनी सादर केला असून या विरुद्ध सदरच्या गुन्ह्यात अडकलेले तथा बहुमतात असलेल्या संचालकांनी वकील मार्फत दि.३ नोव्हेंबर २०२२ रोजी तीव्र स्वरूपाची हरकत घेतल्याची खात्री लायक माहिती आहे.

*फेरफाराचे स्वरूप*

तसेच शेख सुपडू शेख रशीद मन्सुरी सचिव,मुक्तार अली कादर अली खजिनदार,संचालक शेख हनीफ शेख रशीद मन्सुरी,मो.सगिर शेख दगडू बागवान (मयत),लुकमान खान गुलशेर खान,शेख रफिक शेख गुलाब,अक्रम खान अमानुल्ला खान या जुन्या विश्वस्थांचे नाव न्यायासांचे रेकॉर्ड वरून कमी होवून या सर्वांच्या जागी नवीन विश्वस्थ म्हणून सचिव अक्रम खान अमानुल्ला खान,खजिनदार खलिल खान अय्युब खान, संचालक शेख जहीर शेख सलाऊद्दीन,अजमल खान बलदार खान,हसन खान मोहम्मद खान, शेख हैदर शेख गनी, शेख अस्लम शेख कादर यांचे नाव न्यायासंचे रेकॉर्ड मध्ये समाविष्ट करण्याची मागणीचा प्रस्ताव अक्रम खान अमानुल्ला खान यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त जळगांव यांच्याकडे दाखल केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!