ताज्या घडामोडी

सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर सहस्रार्जुन भगवान जयंतीनिमित्त येवल्यात सो. स. क्षत्रिय समाजाच्या वतीने अभिषेक,महाआरती व श्रीसहस्त्रार्जुन भगवान यांच्या पालखीची मिरवणूक

येवला – सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर सहस्रार्जुन भगवान जयंतीनिमित्त येवल्यात सो. स. क्षत्रिय समाजाच्या वतीने अभिषेक,महाआरती व श्रीसहस्त्रार्जुन भगवान यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली तर श्री सहस्त्रार्जुन प्रतिष्ठानच्यावतीने समाज बांधवांसाठी संगीत संध्या व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीसहस्रार्जुन भगवान जयंती निमित्त सहस्रार्जुन प्रतिष्ठानचे सदस्य पांडुरंग भांडगे यांच्या हस्ते सपत्नीक सकाळी
श्रीसहस्त्रार्जुन भगवान व श्रीबालेश्वरी माता यांचा ब्रह्मवृंदांच्या मंत्र घोषाने महाअभिषेक करण्यात आला व विधीवत पूजा करून बालेश्वरी मातेस पैठणी साडी अर्पण करण्यात आली, मंदिर परिसरात भगवे झेंडे लावून परिसर भगवेमय करण्यात आला होता.सायंकाळी श्री सहश्रार्जुन भगवान यांच्या पालखी मिरवणूकीस श्रीबालेश्वरी माता मंदिरा पासून प्रारंभ करण्यात आला. पालखी मिरवणुक डीजे रोड,बुरुड गल्ली,मेनरोड,टिळक मैदान,काळा मारुती रोड,गंगादरवाजा,गांधी मैदान,सहस्त्रार्जुन महाराज मंदिर आदि भागातून काढण्यात आली पालखी मिरवणुकीत समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ठिकठिकाणी पालखीचे औक्षण करण्यात आले,सडा, रांगोळ्या काढुन व फटाक्यांची अताश बाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. श्रीबालेश्वरी मंदिर येथे महाआरती करून श्री सहस्त्रार्जुन प्रतिष्ठानचे वतीने श्री राजराजेश्वर सहश्रार्जुन भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन सो.स.क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष गोविंदसा वाडेकर,उपाध्यक्ष रविंद्रसा चौधरी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन बाकळे, बालेश्वरी प्रतिष्ठानचे उपाअध्यक्ष वसंत वडे, प्रविण पहिलवान,डॉ.किरण पहिलवान,कल्पेश आगफाडे,विष्णू कोकणे,शेखर खेरुड यांच्या हस्ते करण्यात आले,मान्यवरांचा सत्कार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.प्रतिष्टानच्या वतीने संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले होते, त्यात शंकर टाक,भोलानाथ चौधरी,रमेश सांबर,कृष्णा पांढरे यांनी आपल्या सुमधुर स्वरांनी विविध गीतांचे गायन करून समाज बांधवांना मंत्र मुग्ध केले. सूत्रसंचलन दिपक वखारे यांनी केले कार्यक्रम यशस्वतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन बाकळे, उपाध्यक्ष शेखर खेरूड़,योगेश सांबर,सागर खानापुरे,सुमित भांडगे,डॉ.किरण पहिलवान,प्रविण पहिलवान,संजय फुलपगार,वामन वाडेकर,ईश्वर खेरुड,विनोद बाकळे,अमोल चिनगी,पंकज पहिलवान,विलास पवार,श्रीकांत बाकळे,अनिल हबीब,पांडुरंग भांडगे, कांचन पहिलवान,ललित भांडगे,दिपक वखारे,प्रतुल खानापुरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.श्री सहश्रार्जुन प्रतिष्टानने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा समाज बांधवांनी लाभ घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!