ताज्या घडामोडी

एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बीपीसिएलला भेट.*

*एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बीपीसिएलला भेट.*
पोलीस टाईम्स न्यूज/ सुनिलआण्णा सोनवणे

चांदवड:- येथील नॅक मानांकित ‘अ’ दर्जाच्या श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाईं भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी शाखेतील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी भारत पेट्रोलियम अँड कार्पोरेशन लिमिटेड, पानेवाडी, मनमाड येथे नुकतीच इंडस्ट्रियल व्हिजिट दिली आहे.

ऑटोमेशनमध्ये मेकॅट्रॉनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, प्रिव्हेंटिव मेंटेनन्स, इंडस्ट्रियल सेफ्टी, इत्यादी ज्ञानात भर पडणे व त्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना शिक्षणात व भविष्यात करिअर करताना वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात व्हावा या उद्देशाने इंडस्ट्रियल भेट घेण्यात आली. यावेळी ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुणाल कोठावदे याने काम पाहिले.

या भेटीमध्ये भारत पेट्रोलियम अँड कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे प्लांट मॅनेजर प्रशांत खर्गे, सिनिअर मॅनेजर रोशन तिवलेकर, रेसिडंट मॅनेजर अमोल देव यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असून या इंडस्ट्रियल व्हिजिटचे आयोजन प्रा. आर. एस. चौधरी व प्रा. आर. एन. चांदोरे व श्री. उमेश शिंदे यांनी केले तर यशस्वी आयोजनासाठी यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. एस डी. संचेती व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे आदींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

सदर इंडस्ट्रियल व्हिजिटचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम .डी. कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम .आर. संघवी आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

(Photo Caption:)
(चांदवड येथील एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत भारत पेट्रोलियम अँड कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे प्लांट मॅनेजर प्रशांत खर्गे, सिनिअर मॅनेजर रोशन तिवलेकर, रेसिडंट मॅनेजर अमोल देव , प्रा. आर. एस. चौधरी व प्रा. आर. एन. चांदोरे व श्री. उमेश शिंदे आदी )

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!