ताज्या घडामोडी

नागसेन नगरात किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार वस्तूने वर; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागसेन नगरात किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार वस्तूने वर; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात नागसेन नगर परिसरात इलेक्ट्रिक डीपी जवळ पाय जाणाऱ्या तरुणाला किरकोळ कारण वरून एकाने धारदार वस्तूंना वार करून हातावर दुखापात केल्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशन एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मुकेश रोहिदास झाल्टे, ( वय-२६) रा. नागसेन नगर रामेश्वर कॉलनी जळगाव, हा आपल्या परिवारास राहायला आहे. मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी ५:३० वाजेच्या सुमारास तो त्याची भाचीला क्लासला सोडण्यासाठी पाय जात असताना कॉलनीतील इलेक्ट्रिक डीपी जवळ गोपाल देवकर बसलेला होता. त्यावेळी मुकेश म्हणाला की, तुम्ही इथे नशा पाणी करत जाऊ नका, लोकांना त्रास होतो. असे बोलण्याच्या राग आल्याने गोपाल देवकर यांनी त्याच्या हातातील धारदार वस्तू मुकेश झाल्टे त्याच्या उजव्या हाताचे पंजावर मारून दुखापत केली. बुधवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०० वाजता मुकेश झाल्टे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोपाल देवकर, रा. नागसेन नगर रामेश्वर कॉलनी जळगाव, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस पो.हे.कॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!