ताज्या घडामोडी

*एम.एस.जी.एस.च्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यश..

*एम.एस.जी.एस.च्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यश…*
सचिन वखारे:-
दि.16 ऑक्टोंबर रोजी झालेल्या मनमाड येथे पहिल्या जिल्हास्तरीय कराटे चॅम्पियनशिप 2022 यासाठी मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल अंदरसुल या शाळेतील 3 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये या तिघांनीही अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची कमाई केलेली आहे.या मध्ये
1) अथर्व पुंड (सिल्व्हर मेडल)
2) साई सुराडे (ब्राँझ मेडल)
3) सिद्धांत जाधव (ब्राँझ मेडल)
मॅचेसचे ऑर्गनायझर मनमाड येथील चैतन्य शर्मा हे होते.तसेच या मुलांना सौ.वृषाली रोकडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, मयुर सोनवणे, जीवन गाडे, उज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, डॉ.भगीनाथ जाधव, आकाश सोनवणे, जनार्दन जानराव, संगीताताई सोनवणे, शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक अझहर खतीब, अमोल आहेर, गणेश सोनवणे, प्रशांत बिवाल, माधुरी माळी, शर्मिला पवार, सुनीता वडे, चेतना माकुने, सुश्मिता देशमुख, आलिया खान सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!