ताज्या घडामोडी

बेकायदेशीर घरगुती गॅस वाहनांमध्ये भरुन देणाऱ्या विरुद्ध कारवाई

बेकायदेशीर घरगुती गॅस वाहनांमध्ये भरुन देणाऱ्या विरुद्ध कारवाई

प्रतीनीधी

शाहीद खान

जळगाव औरंगाबाद रस्त्यावर जळगाव टोल नाक्या समोर घरगुती गॅस वाहनांमध्ये इंधनाच्या स्वरूपात भरून देणाऱ्या तरुणाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलमाखाली गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे!
एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. इम्रान शेख समद (वय-३८) रा. राथ चौक जळगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कब्जातून सिलेंडर सहा इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे! बेकायदेशीर घरगुती गॅस भरणाऱ्या असल्याची माहिती किसनराव नजन पाटील, यांना समजली होती या माहितीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली आहे.
एलसीबीचे पो.नि. किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील पथकातील पो.हे.कॉ जितेंद्र पाटील, महेश महाजन, पो.ना नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, यांच्यासह एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक शेख अनिस, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना सैय्यद इमरान अली, पो.ना. सचिन पाटील, आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलीस पथकाने ताब्यात घेतलेले इम्रान शेख समद यांच्या कब्जातून सिल तुटलेल्या अवस्थेतील चार सिलेंडर सुस्थितील सहा सिलेंडर, मोटर पंप, वजन काटा, असा एकूण २७ हजार ७०० रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस नाइक नितीन बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इम्रान शेख यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला भा.द.वि कलम २८५ सहा जिवनावशयक वस्तू कायदा कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!