ताज्या घडामोडी

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि अवैधरीत्या बांधकाम करणारे विकासक धनजी पटेल यांच्यात आर्थिक लागेबांधे

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि अवैधरीत्या बांधकाम करणारे विकासक धनजी पटेल यांच्यात आर्थिक लागेबांधे.

प्रतिनिधी :-सुबोध सावंत

ऐरोली दिवागाव मधील सेक्टर ९ येथील विकासक श्री. धनजी पटेल यांचे व मनपा आणि सिडको चे अतिक्रमण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्यात आर्थिक साटेलोटे असल्याचे निष्पन्न होत आहे. मागील काही महिन्यांपासून ऐरोली दिवा गाव परिसरात अनधिकृत बांधकामांवर सदर विभागांकडून हातोडा चालवण्यात येत आहे. पण
धनाड्य असणारे परप्रांतीय विकासक श्री. धनजी पटेल यांच्या अनधिकृत इमारतीवर संबंधित अधिकाऱ्यांची मेहेर नजर असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक भूमिपुत्रांचे बांधकाम पाडण्यात येत आणि सदर इमारत बेकायदेशीर असून व त्याच्या अनेक तक्रारी येऊन संबंधित अधिकारी सदर बेकायदेशीर बांधकाम असणाऱ्या इमारतीवर कारवाई करत नाही हा दुटप्पीपणा नाही का. भूमिपुत्रांना भिकेला लाऊन परप्रांतीय विका सकांना पाठीशी खालून त्यांना आर्थिक गबर करून स्वत:ही गबर होत आहे ही वस्तुस्थिती सामान्य लोकांपासून लपून राहिलेली नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!