ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शहीद भगतसिंह यांना जयंतीनिमित्त आदरांजली


अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये शहीद भगतसिंह यांना जयंती निमित्त आदरांजली देण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नारायणराव देशमुख व रविंद्र गायकवाड तर अध्यक्षस्थानी स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ खान होते. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले.अध्यक्षीय भाषणांत प्रिंसिपल अल्ताफ खान यांनी थोर क्रांतिकारी शहीद भगतसिंह यांनी देशासाठी त्याग व बलिदान या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अमोल आहेर,दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अमजद अंसारी, गौरव सैंदाने, मनिष सैंदाने, अजीम पटेल, ऋषिकेश दुसाने, जयप्रकाश बागुल, माधुरी माळी, शर्मिला पवार, सुनीता वडे, आलिया खान, सुश्मिता देशमुख, प्रिया भागवत आदी सह सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!