ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये गोपाळकाला दहीहंडी चा कार्यक्रम साजरा

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये गोपाळकाला दहीहंडी चा कार्यक्रम साजरा.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये दही हंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमा व सहकार महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना सुस्मिता देशमुख यांनी केली.यानंतर इ.आठवीच्या मधुरा आहेर, श्रद्धा सोनवणे व ग्रुपने समूह गीत, नववीच्या श्रुती फाळके, पाचवीचा विवेक थोरात, सहावीच्या वेदश्री वडनेरे, पूर्वा जगझाप, अनुष्का आराखडे, श्रुती सौंदाने इ. विद्यार्थिनींनी कृष्ण गीत सादर केले.शिक्षिका सोनाली साताळकर, यांनी गीत तर अर्चना एंडाईत यांनी जन्माष्टमी बद्दल माहिती सांगितली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माची नाटिका सादर केली, इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले अध्यक्षीय भाषणात अल्ताफ खान यांनी जगाला प्रेमाचा संदेश देणारे भगवान श्रीकृष्ण यांची माहिती व दही हंडीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यानंतर दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला.यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल आहेर, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, सचिन घोडके, अजिम पटेल, अविनाश बोडारे, पारस भगत, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुनिता वडे, मनीषा लहरे, निदा फारुकी, स्मिता खैरनार इ. शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!