ताज्या घडामोडी

शिवरायांच्या जिवाला जीव देणारे मुस्लिम सैनिक

शिवरायांच्या जिवाला जीव देणारे मुस्लिम सैनिक

आजही सत्यशोधक छत्रपती शिवाजी महाराजाचे नाटक- महानाट्य चित्रपटात महाराजांच्या प्रवेशा वेळी गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज अशी घोषणा केली जाते. महाराजानी गायी पाळून दूधडेन्या चालविल्या नव्हत्या की ब्राह्मणांचे रक्षण दाते नव्हते, जर ब्राह्मणांचे रक्षण दाते होते तर त्यांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणानी का विरोध केला? समर्थ रामदास गुरू स्थानी होते, रामदास ब्राह्मण होता मग महाराजांचा राजाभिषेक करण्यास रामदासाला कोणती अडचण होती महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नसून बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण रयतेचे राजा होते. मराठ्यांनी तलवारीने इतिहास घडविला पण लेखणी दुसऱ्यांच्या हातात होती, म्हणून चुकीचा इतिहास आजपर्यंत जनमानसात रुजविला गेला.

राजाभिषेक घेतल्यामुळे धर्ममोळे सनातनी रूढी परंपरेसाठी, राजाभिषेक करणाऱ्या गागाभट्टला महाराष्ट्रातील काही ब्राह्मणांनी वाळीत टाकले त्या सर्व ब्राह्मणांना महाराजांनी नोकरीतून काढलं. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजलखानाचा विश्वासू वकील, शिवाजी महाराजांच्या मस्तकावर वार केला. खोच पडली. डोक्यात टोप असल्यामुळे महाराज बचावले शिवाजी महाराजावर पहिला वार करणारा भट होता.

शिवाजी महाराजांचे मुस्लिमाबरोबर राजकीय वैर होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लिमांचे महाराजांवर जिवापाड प्रेम होते. त्यांनी कधी दगा-घात बेइमानी केली नाही, इमाने इतबारे सेवा केली. महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख इवाईमखान गारदी वाघनख्या, चिलखत यांनीच पुरविली होती.

मुसलमान होता. मुसलमान व्यक्ती महत्त्वाच्या पदावर आरुढ होत. नुरखान बेग हा स्वराज्याचा पहिला सरनौबत होता. दयाँ सारंग दौलतखान आरमार प्रमुख होते. सिद्धी हिलाल हा घोडदळ प्रमुख होता. ईब्राहीम तोफखाना प्रमुख होता. काजी हैदर वकील होता. मदारी मेहतर विश्वासू सरदार अंगरक्षक होता. आरमारात ७० टक्के पायदळ सैन्य होते, तर घोडदळ ३० टक्के होते हे सर्व मुसलमान होते. त्यांनी शिवाजी महाराजांशी कधीही फितुरी दगाबाजी कधी केली नाही.

सिद्धी जोहरच्या पन्हाळा वेदवातून सोडविण्यासाठी, सिद्धी हिलाल व त्यांच्या पाच पुत्रांनी बलिदान केले हे मुस्लिम होते,

आग्राहून कैदेतून सुटण्यासाठी मदारी मेहतरने जिवाची बाजी लावली हा मदारी मेहतर मुस्लिम होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव अस्सल चित्र काढणारा चित्रकार मिर महंमद हा मुस्लिम होता. मिर महंमदाने चित्र काढल्यामुळे आज आपण छत्रपती शिवाजींना पुतळ्याच्या रूपाने पाहू शकणे इतके उपकार मिर महंमदाचे ओबीसी मराठा बांधवांवर आहे. लहरी हैदर व शाहीर अमरशेख यांनी प्रेरणादायी पोवाडे लिहिले व गायले सुद्धा सिद्धी हिलाल, सिद्धी बहावा, इब्राहिम खान, इमाईनखान, नुस्खानबेग, मदारी मेहतर, काजी हैदर, सुलेमान, सिद्धीहर यहीया, हुसेनखान रुस्तमे जमाल, दर्यासारंग दौलतखान, सिद्धीमीसीर, सुलतान खान, दाऊद खान हे सर्व सरदार महाराजाचे जिवलग मित्र होते.घ भूमीच्या मूळ असणाऱ्या मूलनिवासी बहुजनांना शिक्षणाचा, संपत्तीचा, स्त्रीचा अधिकार धर्माच्या नावाखाली नाकारल्यामुळे ब्राह्मणांच्या धार्मिक जाचाला कंटाळून, त्या काळचे बहुजन बांधव मुस्लिम, ख्रिश्चन झाले भारतीय अज्ञानी आणि गरीब जनतेच्या मनावर मुसलमान हे भारताचे व मूलनिवासी बहुजनांचे शत्रू आहेत असे बिंबविण्यामध्ये आरएसएस यशस्वी झाली आणि आजही तीच परिस्थिती आहे. गुजरात हत्याकांड ताजे उदाहरण काय सांगते. शिवाजी महाराजांचे २० अंगरक्षक मुस्लिम होते. सैन्यात ४० टक्के मुसलमान होते. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी, अफजलखानाची इत्यंभूत माहिती रुस्तुमे जमाल यांनी पुरविली. खान तुम्हाला दगा करील हा इशारा रूस्तुम जमालने दिला होता.

शहारा शरीफ या मुस्लिम संतांच्या दग्र्याच्या नावावरून शाहाजी हे नाव ठेवले म्हणजे वडिलापासून मुस्लिमांबद्दल प्रेमाची भावना होती मत्सर नव्हता हे सिद्ध होतं. मुस्लिम असून सुद्धा भगवत गीतेचे पारशी भाषेत भाषांतर केले. दारशुकेहला संस्कृत भाषा अवगत होती, पडितांना आश्रय दिला. परंतु औरंगजेबाला त्यांच्या कृत्याच्या विचारक्षमतेच्या विरुद्ध असल्यामुळे हा काफर आहे, धर्मद्रष्टा आहे म्हणून त्याला १६५० मध्ये ठार मारले व त्यांच्या राज्याचा मालक बनला. औरंगजेबाऐवजी दाराशुकेच राज्य असत तर मुसलमानांचा हा इतिहास घडला नसता!

तुकाराम सोनवणे मो. ९५५२७४३३९०

O

Δ

O

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!