ताज्या घडामोडी

तांबापुरात मच्छी बाजारात तरुणाला शिवीगाळ करत मारहाण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तांबापुरात मच्छी बाजारात तरुणाला शिवीगाळ करत मारहाण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील मच्छी बाजारात एकमेकांकडे पाहिल्याच्या रागातून तरुणाला एकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजता घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक माहिती अशी की, तांबापुरा परिसरात मच्छी बाजारात समीर मुस्तकीन बागवान (वय-१८) राहतो. समीर हा गुरुवारी रात्री ९:३० वाजता घराजवळ असतांना या ठिकाणी तांबापुरा परिसरात गणेश गवळी हा तरुण आला. समीरने त्याच्याकडे बघितले, असता याचा राग आल्याने गणेश गवळी याने समीर यात काही एक कारण नसतांना शिवीगाळ करत चापटाबुकक्यांनी मारहाण केली. यात समीर जखमी झाला आहे. या प्रकरणी समीर याने दिलेल्या तक्रारीवरून गणेश गवळी पुर्ण नाव माहीत नाही रा. गवळीवाडा तांबापुरा यांच्याविरुद्धात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हे.कॉ नितीन पाटील हे करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!