ताज्या घडामोडी

जप्त केलेली देशी व विदेशी दारू वरिष्ठांच्या आदेशानुसार चांदवड पोलीस स्टेशन ने केली नष्ट*

*जप्त केलेली देशी व विदेशी दारू वरिष्ठांच्या आदेशानुसार चांदवड पोलीस स्टेशन ने केली नष्ट*
पोलीस टाईम्स न्युज/सुनिलआण्णा सोनवणे

*चांदवड*: नशाबंदी गुन्ह्यांमधील एक हजार रुपये किमतीच्या आतील जप्त मुद्देमाल सन 2021, 2022, 2023 मधील मे 2023 अखेर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माननीय शहाजी उमप यांनी आदेश दिल्याने व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड सोहेल शेख (उपविभाग मनमाड) यांनी परवानगी दिल्यानंतर हा जप्त केलेला माल विल्हेवाट करणे कामे चांदवड पोलीस स्टेशन मधील देशी व विदेशी दारूचा 80 हजार 376 रुपये किमतीचा व ११८५ सीलबंद बाटल्या ह्या दोन पंचांसमक्ष पंचनामा करण्यात येऊन नाश करण्यात आला.

सदरचा मुद्देमाल नष्ट करतेवेळी चांदवड पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपाधीक्षक श्रीमती सविता गर्जे मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक नरे, पोलीस नाईक दिनेश सूळ, पोलीस नाईक सानप, पोलीस शिपाई सूर्यवंशी, पोलीस शिपाई बस्ते यांच्या समवेत पाच होमगार्ड व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!