ताज्या घडामोडी

‘अमृत भारत स्टेशन स्कीम चे नगरसुल येथे रविवार दि. ०६/०८/२०२३ रोजी भव्य उद्घाटन “

‘अमृत भारत स्टेशन स्कीम चे नगरसुल येथे रविवार दि. ०६/०८/२०२३ रोजी भव्य उद्घाटन ”

येवला – देशभरातील पाचशे पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांचा विकास करणारी अमृत भारत स्टेशन स्कीम चे उद्घाटन पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने रविवार दि. ०६/०८/२०२३ रोजी संपन्न होणार आहे. आपल्या तालुक्यातील वेगाने विकसित होणाऱ्या नगरसुल रेल्वे स्थानकाचा या योजनेमध्ये समावेश केला आहे.

रेल्वे स्थानकात प्रवेश केल्या पासून प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उदा.- पार्किंग, स्थानक प्रवेशद्वार प्रवासी प्रतीक्षालय कक्ष, प्लटफार्म, विविध सुविधा, फ्लाय ओवर ब्रिज, जिने, सरकते जिने, यांसह सर्व पायाभूत सुविधा सोयीनी सज्ज असलेले रेल्वे स्थानक अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत तयार करण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक प्रसंगी नगरसुल स्थानकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आर्कि. अमृताताई पवार यांनी सांगितले. मा.नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते होणाऱ्या कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर येथे प्रसारण होणार असुन तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अमृताताई पवार यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहण्याकरिता नागरिकांना वाहन व्यवस्था करण्यात आलेली असून कार्यक्रम यशस्वीते करिता प्रमोद दादा पाटील दक्षिण मध्य रेल्वेचे सल्लागार / समिता सद्श्य मनोज दिवटे, भाजपा तालुका अध्यक्ष – डॉ. नंदकुमार शिंदे, शहराध्यक्ष – तरंग गुजराथी, जिल्हा कोषाध्यक्ष- प्रमोद सस्कर, नानासाहेब लहरे, बापुसाहेब गाडेकर, छगन दिवटे, दत्ता सानप, बाळासाहेब कुन्हे, दिनेश परदेशी, बाळासाहेब आहेर, जितेंद्र पहीलवान, गंडाळ मामा, सखाहरी लासुरे, सुनिल सोमासे, दत्ता सानप, प्रकाश मोरे, किरण महाले बबनराव कानडे आदींसह कार्यकर्ते प्रयत्न करत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!