ताज्या घडामोडी

आरटीई २५% आरक्षण अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ इयत्ता १ली साठी येवला तालुक्यात २३ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी..

आरटीई २५% आरक्षण अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ इयत्ता १ली साठी येवला तालुक्यात २३ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी..
येवला तालुक्यात आरटीई अंतर्गत खाजगी विना अनुदानित – स्वयंअर्थसहाय्यित शाळां मध्ये २५% जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.त्यानुसार येवला तालुक्यातील सुमारे २३ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी असून, पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. ०१/०३/२०२३ रोजी दुपारी ३ वाजेपासून सुरुवात होणार आहे, असे पंचायत समिती प्र.गटशिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
येवला तालुक्यातील २३ शाळांची माहिती खालील प्रमाणे…
१.स्वामी मुकतानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, येवला, २.मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल, ३. जय बाबाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, नगरसूल, ४.जीवन अमृत इंग्लिश मिडीयम स्कूल, मुखेड, ५. आर्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, पारेगाव, ६.अभिनव बालविकास मंदिर, येवला, ७.ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम स्कूल, येवला, ८.आत्मा मालीक इंग्लिश मिडीयम स्कूल, पुरनगाव, ९.कांचन सुधा अकॅडमी, येवला, १०.अभिनव बालविकास मंदिर, पाटोदा, ११. एस.एन.डी. इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, बाभुळगाव, १२.एस.एन.डी. इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल, बाभुळगाव, १३.गणाधीश इंटरनॅशनल स्कूल, राजापूर, १४.श्री साईनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल, धुळगाव, १५.बनकर पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, अंगणगाव, १६.लक्ष्मी इंग्लिश मिडीयम स्कूल, विखरणी, १७.राधिका इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल, १८.राजेश कदम इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव नेऊर्, १९.संतोष इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाडी, २०.मातोश्री इंटरनॅशनल स्कूल, धानोरे, २१.सईग्रीन इंग्लिश मिडीयम स्कूल, नगरसूल, २२.कांचन सुधा इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, धानोरे, २३.संतोष इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव नेऊर..
*प्रवेशासाठी निकष:
१.पाल्याचा जन्म तारखेचा पुरावा.
२.जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला).
३.पालकाचा रहिवासी पुरावा.
४.अपंगत्वाचा पुरावा
इ.कागद पत्रासह पालकांनी www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती भरून योजनेचा लाभ घ्यावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!