ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 *एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ.सी. व्ही.रमण यांनी “रमण प्रभाव” चा आविष्कार केला होता व त्याची माहिती आजच्या दिवशी २८ फेब्रुवारी रोजी दिली होती.या आविष्कारासाठी डॉ.चंद्रशेखर वेंकट रमण यांना “नोबेल” पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे वरिष्ठ विज्ञान शिक्षक अमोल आहेर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रिंसिपल अल्ताफ खान यांनी विज्ञान बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात अमोल आहेर यांनी डॉ.सी.व्ही.रमण यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी अजीम पटेल, चेतना माकूने, आलिया खान, नीलिमा देशमुख, धनश्री कळांगे, निदा फारुकी, अपर्णा लक्कडकोट, प्रतीक्षा चव्हाण, तरन्नुम सय्यद, कल्याणी देशमुख हे विज्ञान शिक्षक हजर होते.तसेच प्रशांत बिवाल,अमजद अंसारी,गौरव सैंदाने, मनीष सैंदाने, सचिन घोडके, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, सुनीता वडे, सुश्मिता देशमुख, शर्मिला पवार आदिसह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदा फारुकी यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.
[28/02, 21:01] ALTAF KHAN sir ANDEWALE: आरटीई २५% आरक्षण अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ इयत्ता १ली साठी येवला तालुक्यात २३ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी..
येवला तालुक्यात आरटीई अंतर्गत खाजगी विना अनुदानित – स्वयंअर्थसहाय्यित शाळां मध्ये २५% जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.त्यानुसार येवला तालुक्यातील सुमारे २३ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी असून, पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. ०१/०३/२०२३ रोजी दुपारी ३ वाजेपासून सुरुवात होणार आहे, असे पंचायत समिती प्र.गटशिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
येवला तालुक्यातील २३ शाळांची माहिती खालील प्रमाणे…
१.स्वामी मुकतानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, येवला, २.मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल, ३. जय बाबाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, नगरसूल, ४.जीवन अमृत इंग्लिश मिडीयम स्कूल, मुखेड, ५. आर्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, पारेगाव, ६.अभिनव बालविकास मंदिर, येवला, ७.ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम स्कूल, येवला, ८.आत्मा मालीक इंग्लिश मिडीयम स्कूल, पुरनगाव, ९.कांचन सुधा अकॅडमी, येवला, १०.अभिनव बालविकास मंदिर, पाटोदा, ११. एस.एन.डी. इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, बाभुळगाव, १२.एस.एन.डी. इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल, बाभुळगाव, १३.गणाधीश इंटरनॅशनल स्कूल, राजापूर, १४.श्री साईनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल, धुळगाव, १५.बनकर पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, अंगणगाव, १६.लक्ष्मी इंग्लिश मिडीयम स्कूल, विखरणी, १७.राधिका इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल, १८.राजेश कदम इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव नेऊर्, १९.संतोष इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाडी, २०.मातोश्री इंटरनॅशनल स्कूल, धानोरे, २१.सईग्रीन इंग्लिश मिडीयम स्कूल, नगरसूल, २२.कांचन सुधा इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, धानोरे, २३.संतोष इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव नेऊर..
*प्रवेशासाठी निकष:
१.पाल्याचा जन्म तारखेचा पुरावा.
२.जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला).
३.पालकाचा रहिवासी पुरावा.
४.अपंगत्वाचा पुरावा
इ.कागद पत्रासह पालकांनी www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती भरून योजनेचा लाभ घ्यावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!