ताज्या घडामोडी

शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांचा थेट तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा*

*शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांचा थेट तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा*

प्रतिनिधी-एजाज देशमुख

येवला.. दिनांक
19 जुलै शुक्रवार रोजी कष्टकरी कामगार एकता संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चासाठी येवला तालुक्यासह विविध तालुक्यातून संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह अनेक स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरद लोहकरे सर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता माऊली लॉन्स विंचूर रोड येथून मोर्चाला सुरुवात झाली. प्रथमता नामदार भुजबळ साहेब यांच्या कार्यालयावर मोर्चा आला. संघटनेच्या वतीने भुजबळ साहेबांचे स्वीय सहाय्यक श्री. लोखंडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चा विंचूर चौफुली येथे आला. तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मोर्चा तहसील कार्यालयावर गेला. सदरच्या मोर्चामध्ये विविध तालुक्यातून संघटनेचे अनेक पदाधिकारी तसेच स्त्रिया व पुरुषांनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन तसेच थाळी नाद करत मोर्चा तहसील कार्यालयावर आला. तहसील कार्यालयावर संघटनेचे पदाधिकारी यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री लोकरे सर यांनी कर्मचाऱ्यांना किमान 15000 रुपये वेतन द्यावे. त्यांना युनिफॉर्म द्यावा, वीस लाखाचा विमा संरक्षण द्यावे. विनाकारण कोणत्याही कर्मचाऱ्यास कामावरून काढू नये यासह अनेक मागण्या केल्या. यावेळी लोहकरे सर यांनी सांगितले की सरकारने सध्या लाडकी बहीण ही योजना आणली आहे. मग ह्या स्त्रिया तुमच्या बहिणी नाहीत का? यांना केवळ 80 रुपये प्रति दिवसावर का राबावं लागतं ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने यावर लवकर उपाय शोधावा अन्यथा पुढील मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येईल . याची शासनाने नोंद घ्यावी. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!