ताज्या घडामोडी

स्माईल प्लीज… काळाच्या पडद्याआड… इथे ओशाळला मुर्त्यू

स्माईल प्लीज… काळाच्या पडद्याआड… इथे ओशाळला मुर्त्यू

प्रतिनिधी : रमेश डोंगरे, कोल्हापूर

बांबवडे – मध्यप्रदेश इंदूर येथील मोरल या कंपनीची कॉन्फरन्स आटपून अयोध्या येथील राम मंदिराचे दर्शन करून पुढील प्रवासासाठी निघालेल्या दिलावर मकबूल तांबोळी यांच्यासह अन्य तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमध्ये बांबवडे चे दिलावर तांबोळी हे मृत्यू झाले आणि संपूर्ण शाहूवाडी तालुका हळहळला.

गेल्या 60 ते 70 वर्षापासून बांबवडे या मध्यवर्ती ठिकाणी त्यांचे दिलावर फोटो स्टुडिओ या नावचे फोटो स्टुडिओ आहे. तांबोळी सरांचे तसे हे कुटुंब सुशिक्षित आणि सुसंस्कृत व उच्च शिक्षित वैद्यकीय व्यवसाय आणि शिक्षकी पेशा जपणारे प्रसिद्ध घराणे. महात्मा गांधी विद्यालय बांबवडे येथे त्यांचे वडील शिक्षक होते. संपूर्ण बांबवडे परिसरासह शाहूवाडी तालुक्यांमध्ये दिलावर फोटो स्टुडिओचे मालक दिलावर तांबोळी उर्फ भैया सर्वांच्या परिचयाचे आणि एकेकाळचे हॉलीबॉल पट्टू आणि त्या वेळेचे तरुणांचे आयकॉन सामाजिक कार्यातही भैय्या यांचे मोठे योगदान असायचे. पण फोटोग्राफी व्यवसायामध्ये त्यांनी प्रचंड नावलौकिक कमावला होता. त्यांच्या फोटो स्टुडिओमध्ये गेले की त्यांचा फोटो काढतानाचा शब्द असायचा आजही त्यांचे शब्द आठवतात स्माईल प्लीज… व्यवसायाबरोबर या माणसाने प्रचंड प्रमाणामध्ये माणुसकीचा गोतावळा निर्माण केला. त्यांच्या या दुर्दैवी जाण्याने आणि या भीषण अपघाताने सर्वांची मने चुकचुकली बांबवडे परिसरामध्ये कित्येक मन हळहळली आणि अखेर मृत्यू ही येथे ओशाळला. त्याकाळी लहानपणापासून बारशाच्या कार्यक्रमापासून ते शुभ कार्य अशा विविध कार्याची फोटो काढण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भैय्यांचे दिलावर फोटो स्टुडिओ कित्येकांच्या बारशाच्या घुगऱ्या आणि लग्नाचे लाडू भैय्यानी खाल्लेले एखाद्याने नवी गाडी आणली एखाद्याने नवा बैल आणला एखाद्याने नवीन घर बांधले एखाद्याने नवीन ट्रॅक्टर आणला तर भैयाच फोटो काढायला हे समीकरण या परिसरात ठरलेला असायचं ….बांबवडे तील या भैय्याच्या दिलावर फोटो स्टुडिओने कित्येक माणसांच्या दिला…वर अक्षरशा गारुड केलं. भैय्याच्या जाण्याने लहानापासून थोरापर्यंत संपूर्ण बांबवडे परिसर हळहळला आजवर कित्येकांचे स्माईल प्लीज म्हणून फोटो काढणाऱ्या त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा फोटो मोबाईल स्टेटस वर ठेवला. अनेकांची मने भरून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. नियतीचा खेळ हा वेगळा असतो आणि खेळ कुणाला दैवाचा कळत नसतो. प्रत्येकाला एक ना एक दिवस जाणं जरूर असतं पण काही माणसांचे जाण त्यांच्या कार्यकर्तृत्वाने लक्षात राहत. त्यापैकीच या परिसरातील भैय्याचं जाणं अनेकांना धक्का देऊन गेल. मला आजही आठवते की 1986 ला माझी दहावीची परीक्षा होती आणि दहावीच्या परीक्षेला फोटो काढण्यासाठी आम्हा सर्वच विद्यार्थ्यांना दिलावर फोटो स्टुडिओमध्ये जावं लागायचं मी विद्यार्थी दशेत असताना दहावीला फोटो काढण्यासाठी त्यांच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो. त्यावेळी दहावीची परीक्षा पुढे असताना एक महिना अगोदर फोटो काढायचे. आजच्यासारखी त्यावेळी प्रगतशील अशी साधने कोणती नव्हती. एका छोट्याश्या स्टुलावर मला बसवलं पाठीमागे हिरवा पडदा बाजूला झगमगणाऱ्या लाईटची छत्री आणि मध्यभागी तो छोटासा स्टूल मला आजही आठवते भैयाने मला त्या स्टूल वर बसवलेलं होतं दोन्ही कानाला हात लावून त्याच स्टुलावर ताठ बसायला सांगितलं आणि म्हणाले थोडंसं स्माईल प्लीज… आणि त्यावेळी माझ्यावर फ्लॅश पडला. नंतर पंधरा दिवसांनी मी त्यांच्याकडून माझे फोटो घेऊन आलो. काल त्यांच्या अपघाती मृत्यूची पेपर मधील फोटो सहित बातमी पाहिली आणि मन गहिवरले आणि त्यांचे आजही शब्द मला आठवले स्माईल प्लीज….
मित्रांनो स्माईल प्लीज म्हणणारे भैय्या काळाच्या पडद्याआड गेले आणि इथे मृत्यू ही ओशाळला कारण दिलावर फोटो स्टुडिओ च्या माध्यमातून भैयानी अनेकांच्या दिलावर राज्य केलं…

.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!