ताज्या घडामोडी

मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२४ तर्फे एम.एस.जी.एस. शाळेतील ५ गुणवंतांचा गौरव.*

*मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२४ तर्फे एम.एस.जी.एस. शाळेतील ५ गुणवंतांचा गौरव.*
येवला :- *मंथन वेलफेअर फाउंडेशन आयोजित, मंथन सामान्य ज्ञान परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ राधाकृष्ण लॉन्स येवला येथे पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील मारवाडी (विस्तार अधिकारी, पंचायत समिती येवला), पंकज माळी (संस्थापक, करिअर अकॅडमी), विक्रम गायकवाड (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद येवला), अमोल सोनवणे (सरचिटणीस, अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ), प्रभाकर झळके (सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार, येवला), आकाश सोनवणे (संचालक, अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ), रामदास भवर (केंद्र प्रमुख), तेजस राऊत (समन्वयक, मंथन वेलफेअर फाउंडेशन येवला), योगेश सोनवणे (प्राचार्य, आत्मा मालिक) हे होते.*
*या मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेतील ५ ही विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे..*
*१. समृद्धी सचिन सोनवणे इ.३री.*
*२.राजवीर अमोल सोनवणे इ.३री.*
*३.स्वरा मयूर सोनवणे इ.५वी.*
*४. खदिजा अल्ताफ खान इ.५वी.*
*५.वैष्णवी सुरेश आहेर इ.६वी.*
*सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील अर्चना एंडाईत, नीलिमा देशमुख, सुनीता वडे, पूनम जमधडे, पारस भगत या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.*
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक तथा कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायकवाड, संचालक जीवन गाडे, डॉ.भागिनाथ जाधव, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, सौ.संगीताताई सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, शिक्षक अमोल आहेर, अझहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अजीम पटेल, सचिन घोडके, राजेश कांबळे, माधुरी माळी, सह सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!