ताज्या घडामोडी

हातमाग विनकारांना वृद्धापकाळ पेन्शन योजना लागू करा*

*हातमाग विनकारांना वृद्धापकाळ पेन्शन योजना लागू करा*
( मुंबई ) आज महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री मा ना चंद्रकांत दादा पाटील यांची मुंबई येथे भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोष्ठच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन राज्यातील हातमाग विणकारांना *एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023/28*अंतर्गत उत्सव भत्ता ;200 युनिट वीज माफी योजना या सारख्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी हातमागावर हस्तकलेने तयार केलेल्या श्री गणेशाची प्रतिमा फ्रेम भेट देऊन ऋण व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विणकर प्रकोष्ठच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन महाराष्ट्रातील विणकारांना वृद्धापकाळ पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली तसेच उत्सव भत्ता व 200 युनिट वीज माफी योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहिलेल्या विणकारांना या योजनेत लवकरात लवकर समाविष्ट करून त्यांना लाभ देण्याची मागणी केली
यावेळी भाजपा विणकर प्रकोष्ठ चे प्रदेशाध्यक्ष मनोज दिवटे ,संतोष भरते ,सुरेश कुंभारे, दत्ताभाऊ जगझाप,भाऊसाहेब साताळकर ,अंबादास अभंग आदी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!