ताज्या घडामोडी

*मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामाची पाहणी*

*मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामाची पाहणी*

*येवला, :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या अस्तरिकरणाचे काम अतिशय जलद गतीने सुरू आहे. आज नगरसुल परिसरात सुरू असलेल्या या अस्तरीकरण कामाची मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करून अस्तरीकरण कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी येवला बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, येवला शहराध्यक्ष दीपक लोणारी,भागिनाथ पगारे,सतीश पैठणकर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, विजय जेजुरकर, सुमित थोरात, गोटू मांजरे, डॉ.कमलेश पैठणकर, पार्थ कासार, गणेश गवळी, यांच्यासह पदाधिकारी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला तालुक्याला दुष्काळमुक्त करून नवसंजीवनी देण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या मांजरपाडा प्रकल्पातील पाणी येवला तालुक्यातील दुष्काळी डोंगरगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी पुणेगाव दरसवाडी ते डोंगरगाव या संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. या कामासाठी सुमारे २५६ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम अतिशय जलद गतीने सुरू आहे.मे महिन्याच्या अखेरीपर्यंत अस्तरीकरणाचे हे काम पूर्ण होऊन यंदाच्या पावसाळ्यात डोंगरगाव पर्यंत पाणी पोहचविण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने आज मंत्री छगन भुजबळ यांनी दरसवाडी ते डोंगरगाव टप्प्यातील नगरसुल परिसरात कामाची पाहणी करत कामाची सद्यस्थिती जाणून घेतली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!