ताज्या घडामोडी

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेत भूमिका महत्त्वाची– तहसीलदार महाजन

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेत भूमिका महत्त्वाची– तहसीलदार महाजन
—————————————-
निवडणूक प्रक्रिया राबवत असताना वेगवेगळ्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची जशी मदत होते, तशीच मदत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मदत देखील फार महत्त्वाची असते ,अशी प्रतिपादन येवल्याचे तहसीलदार आबा महाजन यांनी केले. लोकसभा दिंडोरी मतदार संघाच्या 119 विधानसभा मतदारसंघ येवला या ठिकाणी चतुर्थश्रेणी कर्मचारी(शिपाई )यांच्या प्रशिक्षणवर्गात महाजन बोलत होते .

बहुतांशी चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे स्थानिक ठिकाणी कार्यरत असल्यामुळे निवडणूक केंद्रावरील महत्वाच्या कामात या कर्मचाऱ्यांची मदत नेहमीच असते. आपल्याला नेमून दिलेले काम काटेकोरपणे व नियमांच्या अधीन राहूनच करावी.इतर निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर योग्य समन्वय साधावा.अशा सूचना महाजन यांनी केल्या.
प्रशिक्षणाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मतदानासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया यावेळी करून घेण्यात आली ,यावेळी नायब तहसीलदार नितीन बाहीकर, पंकज मगर, स्वीप समन्वयक दत्ता उगले, अमितकुमार कलगुंडे,रवींद्र शेळके,सुनील महाजन आदी उपस्थित होते
————————————-+
गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावणार

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!