ताज्या घडामोडी

जळगाव शहरात मेहरुन परिसरात ५५ बैल एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव शहरात मेहरुन परिसरात ५५ बैल एमआयडीसी घेतले

पोलिसांनी ताब्यात

जळगाव शहरातील आज दिनांक 25/06/2023 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहीती मिळाली होती की, मास्टर कॉलनी, कुरेशी मोहल्ला, पिरजादे वाडा, अक्सा नगर मेहरुण जळगाव भागात काही चोरीची जनावरे वाहनात अवैधपणे कोंबुन त्यांची कत्तली साठी वाहतुक करुन घेवुन जात आहे तसेच अवैध जनावरांची कत्तल करत आहे बाबतची माहीती मिळाल्याने सकाळी मास्टर कॉलनी, मेहरुण जळगाव येथे मोहीम राबवुन 1) लेलँड वाहन क्र. एम.एच 19 सीवाय 2330, 2) छोटा हत्ती वाहन क्र. एम.एच 47 ई 3014, 3) महींद्रो बोलेरो पिकअप वाहन क्र. एमएच 19 सीवाय 3239 असे वाहन मास्टर कॉलनी कडे जात असतांना पकडण्यात आले होते. सदर वाहनात चोरुन कत्तली करीता व निर्दयतेने वाहतुक करीत असतांना एकुण 194,000/- रुपये किंमतीचे 15 नग बैल (गोवंश) पकडण्यात आले होते. सदरची वाहतुक ही 1) शेख राजीक शेख रफिक सोबत असलेला, 2) शेख रेहान शेख युसूफ कुरेशी वरणगांव जि जळगाव, 3) अदनान कय्युम खान रा दत्तनगर मेहरुण जळगाव, त्याचे सोबत असलेले, 4) ईफतेखार शरीफ खान रा मास्टर कॉलनी जळगाव, 5) सरफराज रहीम शेख रा, मास्टर कॉलनी जळगाव, 6) सैय्यद वाजीद सैय्यद इब्राहीम रा रथ चौक, जुने जळगाव व त्याचे सोबत, 7) सैय्यद अनीस सैय्यद हमीद मन्यार मन्यार मोहल्ला मेहरुण जळगाव, हे करीत असतांना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यांना अटक करण्यात आली होती. व तसेच दुस-या कारवाई मध्ये अक्सा नगर मेहरुण जळगाव येथे पत्र्याचे शेड मध्ये 1) असरार शेख मुक्तार शेख, व त्याचा अल्पवयीन भाऊ व iftekar शेख व सत्तार शेख असे रा अक्सा नगर, मास्टर कॉलनी मेहरुण जळगाव असे महाराष्ट्र राज्यात बैल (गोवंश) कत्तल करण्यास प्रतिबंध असतांना सुध्दा कत्तल करतांना मिळुन आले होते तसेच सदर कत्तल खाण्याजवळ 310,000/- रुपये किंमतीचे 40 बैल (गोवंश) कोठुन तरी चोरी केलेले मिळुन आलेले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन असरार शेख मुक्तार शेख यास अटक करण्यात आलेली आहे.

सदर एकुण केलेल्या कारवाई मधे 504,000/- रुपये किंमतीचे 55 नग बेल (गोवंश) तसेच गुन्हयात वापरलेले 10,000,00/- रुपये किंमतीचे 03 वाहने जप्त करण्यात आलेले आहे. व 08 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरचे कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी साहेब मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावीत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे, पोउनी दत्तात्रय पोटे, सफो अतुल वंजारी, पोहेका प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, दिपक चौधरी, पोना, सचीन पाटील, योगेश बारी, ईमरान सेव्यद, किशोर पाटील, किरण पाटील, मंदार पाटील, चेतन पाटील, महोला पोलीस अंमलदार, आशा पांचाळ यांनी कारवाई केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउनी दत्तात्रय पोटे हे करीत आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!