ताज्या घडामोडी

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलची येवले नगरपरिषद आयोजित स्पर्धेत चमकदार कामगिरी.

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलची येवले नगरपरिषद आयोजित स्पर्धेत चमकदार कामगिरी.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नगरपरिषद येवला आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त स्वच्छ सर्वेक्षण-2024 व माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण कार्यक्रम येवला नगरपरिषद मुख्याधिकारी किरण देशमुख साहेब ,मा.बाळासाहेबलोखंडे साहेब(स्वीय सहायक, मा.भुजबळ साहेब, कार्यालय),अमृताताई पवार,आनंद शिंदे,सचिन सोनवणे,मिननाथ पवार,दिनेश परदेशी,प्रमोद सस्कर,पुष्पा गायकवाड,स्वच्छ भारत अभियान प्रकल्प अधिकारी संदीप बोढरे यांच्या उपस्थितीत पार पडला.स्कुलला चित्रकला स्पर्धा लहान गट प्रथम क्रमांक-मोहम्मद अली अल्ताफ खान
तृतीय क्रमांक-मधुरा अमोल आहेर.
वक्तृत्व स्पर्धा लहान गट
द्वितीय क्रमांक-स्नेहल महेंद्र देशमुख यांनी पटकावला.
विद्यार्थ्यांना प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक अजहर खतीब, निलिमा देशमुख, सिद्धी दोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, प्रशासकीय अधिकारी व संचालक राजेंद्र गायकवाड, सहचिटणीस मयूर सोनवणे, जीवनशेठ गाडे, डॉ.भागिनाथ जाधव, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, संगीताताई सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!