ताज्या घडामोडी

रामेश्वर कॉलनी परिसरात उधारीच्या पेशांवरून तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्ययाला अटक

रामेश्वर कॉलनी परिसरात उधारीच्या पेशांवरून तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्ययाला अटक

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या तरुणाला उधारीच्या पेशांवरून लाकडी दांडक्याने मारहाण करणाऱ्या संशयताला बुधवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता रामेश्वर कॉलनीतून अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी केली आहे. योगेश उर्फ कर्कटक भागवत जाधव रा. रामेश्वर कॉलनी जळगाव असे अटक केलेल्या संशयत आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की सागर सुरेश कोळी (वय-३२) व्यवसाय- मिस्तरी काम रा. सुनंदा किराणा समोर तुळजामाता नगर रामेश्वर कॉलनी जळगाव हा
दिनांक, २९/११/२०२३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आदित्य हॉटेल समोर आदित्य चौक जळगांव येथे बसलेला असतांना सदर ठिकाणी त्याचा मीत्र योगेश उर्फ कर्कटक भागवत जाधव व त्याचे सोबत एक जण आले होते तेव्हा सागर याने योगेश जाधव याला दिलेले उधारीचे पैसे परत मागीतले असता योगेश याने तेथे पडलेला लाकडी दाड्याने सागर याच्या डाव्या हातावर मारून जबर दुखापत केली व डाव्या व पायावर सुध्दा मारून दुखापत केली होती व योगेश जाधव सोबत असलेला त्याचा मित्र याने सुध्दा सागर यास हात बुक्यांनी खाली पाडून मारपीट केला व जिवाने ठार मारण्याची धमकी दिली होती म्हणून सागर याचा सिविल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना घेतलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर योगेश हा पसार झाला होता त्याचा शोध घेऊन त्याला ६-१२&२०२३ रोजी नेरी इथून ताब्यात घेतले होते व त्याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केलेली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी किशोर पाटील पंकज पाटील ललित नारखेडे छगन तायडे अशांनी केली आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!