ताज्या घडामोडी

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….* *नगरसुल ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती व अनुषंगिक ३ कोटीची विविध विकास कामे मंजूर*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….*

*नगरसुल ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती व अनुषंगिक ३ कोटीची विविध विकास कामे मंजूर*

*नाशिक,येवला,दि.१ डिसेंबर :-* राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील नगरसुल ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थान, संरक्षण भिंत यासह अनुषंगिक विकासकामांसाठी ३ कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नगरसुल परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

येवला विधानसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची निर्मिती करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार नगरसुल ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थान, संरक्षण भिंत यासह अनुषंगिक कामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

नगरसुल ग्रामीण रुग्णालयात टाईप १ व टाईप- ३ कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती करण्यासाठी ९९.९९ लाख, टाईप २ व टाईप-४ कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती करण्यासाठी ९९.९९ लक्ष तर
येथील निवासस्थान आवारास संरक्षण भिंत बांधणे व जोता संरक्षण देण्यासाठी ९९.९८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!