ताज्या घडामोडी

लोंबकळलेल्या‎ वीजेच्या तारांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती फाउंडेशनच्या वतीने महावितरणला निवेदन सादर

लोंबकळलेल्या‎ वीजेच्या तारांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती फाउंडेशनच्या वतीने महावितरणला निवेदन सादर

ममदापूर गावातील देवदरी-खरवंडी मार्गावरील तसेच गावातील अनेक भागातील महावितरणच्या पोल व तारा धोकादायकरित्या खाली लोंबकळत आहे. या लोंबकळणाऱ्या पोल व तारांमुळे नागरिकांच्या जिवीतास मोठा धोका निर्माण झाले, तसेच मोठी वित्तहाणी देखील होण्याची खुप शक्यता आहे. सदर लोंबकळणाऱ्या तारांबाबत सुमारे महावितरण कर्मचाऱ्यांकडे तोंडी पाठपुरावा केलेला आहे; परंतू महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेले दिसते. ममदापूर गावातील शनी मंदिर परिसरात महावितरणचा पोल आहे. या पोलवरील प्रवाही तारा वर्षभरापासून लोंबकळत आहे. लोंबकळत असलेल्या तारा त्वरित दुरुस्त करण्यात याव्या या मागणीचे निवेदन देविदास गुडघे पाटील,(संस्थापक अध्यक्ष छ्त्रपती फाऊंडेशन,वारकरी मंच नासिक जिल्हा संपर्क प्रमुख) यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सहाय्यक अभियंता राजापुर सुरज हुरपुडे,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता येवला शहर वीरेश बारसे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.या तारांखालून ग्रामस्थांचा नित्याचा येण्या-जाण्याचा मार्ग आहे, तसेच जवळच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. सदरचा रस्ता हा देवदरी-खरवंडी मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे सदर मार्गवर मोठ्याप्रमाणात रहदारी असते. त्यामुळे सदर मार्गांवरून ग्रामस्थ जिव मुठीत धरून चालतात/प्रवास करतात. त्यामुळे सदर तारांचा धक्का लागुन अप्रिय घटना घटण्याची खुप शक्यता आहे. सदर लोंबकळणाऱ्या तारांमुळे पावसाळ्यात देखील वादळी वाऱ्यांमुळे शॉर्टसर्किट होत असते. व त्यामुळे विजेचा खोळंबा होणे. नित्याचेच झालेले आहे. त्यामुळे महावितरणने या बाबींकडे युध्दपातळीवर लक्ष देऊन लोंबकळणाऱ्या पोल व तारांचा त्वरीत बंदोबस्त करावा व भविष्यात होणारी जिवीत व वित्त हानी टाळावी ही नम्र विनंती. असे न झाल्यास महावितरण कार्यालय नगरसूल समोर उपोषण आंदोलन करण्यात येईल याची गंभिर नोंद घ्यावी. असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी देविदास गुडघे पाटील, पत्रकार दिपक उगले,विजय मते अदिजन उपस्थित होते.

प्रतिक्रिया ÷
जिल्हा परिषद शाळेसमोरील पोल वरील तारा लोमकळलेल्या अवस्थेत असल्याने या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे तारीचे घर्षण होऊन अपघात होऊ शकतो
“श्री देविदास गुडघे पाटील ”
( संस्थापक छत्रपती फाउंडेशन,
वारकरी मंच नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख प्रमुख.)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!