ताज्या घडामोडी

अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर उसवाडच्या ग्रामस्थांना मिळाला न्याय उपोषणाची सांगता

*अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर उसवाडच्या ग्रामस्थांना मिळाला न्याय उपोषणाची सांगता*
पोलिस टाईम्स न्युज/ सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड:* तालुक्यातील उसवाड येथील ग्रामपंचायतीने राहुड धरणक्षेत्रात भारत निर्माण योजनेची 2008 सालापासून बांधलेल्या विहीरी द्वारे पाईपलाईन करून गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीवर अतिक्रमण करून सदर ठिकाणाहून पिण्याच्या पाण्यापासून गावाला वंचित ठेवणाऱ्या व विहीर ही आमचीच आहे असे सांगणाऱ्या चांदवड येथील लोकांविरुद्ध सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हे गेल्या ३ दिवसापासून चांदवड येथील प्रांत कार्यालय समोर उपोषणासाठी बसले होते.
सदर ठिकाणी तहसीलदार मंदार कुलकर्णी व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग यांनी वरिष्ठ पातळीवर शोध मोहीम घेऊन सदर विहिरीचे कागदपत्र व सदर विहीर ही भारत निर्माण योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली असून सदर विहिरी ही राहुड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातच असल्याचे आढळून आल्याचे स्पष्ट झाल्याने सदर ठिकाणाहून मोटार बंद करण्याचे आदेश नरेंद्र कासलीवाल यांना लेखी स्वरूपात तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिले.
उपोषण कर्ते व नरेंद्र कासलीवाल यांच्यात समक्ष चर्चा तहसीलदार मंदार कुलकर्णी व माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल, गणेश निंबाळकर यांच्या समोरच झाल्याने व दोघांमध्येही समेट घडून आणण्यात प्रशासन व नेते मंडळी यशस्वी झाल्याने व गावासाठी अजूनही पाण्याच्या स्त्रोताचा इतर पर्यायांचा सुद्धा या ठिकाणी विचार झाल्याने तसेच उपोषणकर्त्यांचे समाधान झाल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.
या उपोषण कर्त्यांना तहसीलदार मंदार कुलकर्णी, शिरीषभाऊ कोतवाल, गणेश निंबाळकर, नरेंद्र कासलीवाल यांनी सरबत देऊन उपोषणाची सांगता केली.
यावेळी माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल, प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव,भीमराव जेजुरे, नरेंद्र कासलीवाल समाधान जामदार व उसवाड येथील ग्रामस्थ तसेच उपोषणकर्ते संजय पवार, सागर घुले,, रवी बिडगर, भारत अहिरे, संतोष घुले, रामभाऊ शिंदे, वाल्मीक शिंदे, भाऊसाहेब पवार, मनोज सोनवणे, प्रदीप पवार, अनिल बिडगर,ऊसवाड येथील ग्रामसेवक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!