ताज्या घडामोडी

पोलिस अधिक्षक जालना यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे आदेश परत घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय वर पोलीस हक्क संघर्ष संघटना तर्फे विराट मोर्चा.

पोलिस अधिक्षक जालना यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे आदेश परत घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय वर पोलीस हक्क संघर्ष संघटना तर्फे विराट मोर्चा……….!
——————————————-
जालना दिनांक ८ ( प्रतिनीधी )
जालना जिल्ह्यातील
मौजे अंतरवाली सराटी येथील पोलीसांनी केलेले लाठीमार प्रकरणात पोलीस अधीक्षक जालना, अप्पर पोलिस अधीक्षक जालना आणि पोलीस उप अधीक्षक अंबड यांना सक्तीच्या रजेवर पाठवून नंतर निलंबित करणात आले होते. पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ व गैरमार्गाने केलेले पोलीस अधिकार्‍यांचे निलंबन चा आदेश तत्काळ मागे घेऊन दोष मुक्त करून सन्मानाने कर्तव्यावर हजर करून घेण्याच्या मागणीसाठी पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे वतीने दिनांक गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जालना शहरातील अंबड चोफुली पासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे . पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य चे सर्व पदाधिकाऱ्यांनी मोर्च्या मध्ये हजर राहावे असे संस्थापक अध्यक्ष पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य , राष्ट्रीय सचिव राजेंद्र लहाने , राष्ट्रिय उप अध्यक्ष जरयाब शेख , कार्यकारी अध्यक्ष गोपाळ कच्छवें , राज्य सचिव नजीमोद्दीन काजी , महीला आघाडी प्रदेश अध्यक्ष सौ अलका ताई जेजुरकर , जगदीश बिरसने, समीना सत्तार शेख , राज्य उप अध्यक्ष काजी सलीम यांनी कळवले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!