ताज्या घडामोडी

येवल्यात शुक्रवारपासून मुक्ती महोत्सवाचे आयोजन

येवल्यात शुक्रवारपासून मुक्ती महोत्सवाचे आयोजन

येवला : प्रतिनिधी

ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुक्ती महोत्सव समितीच्या वतीने येवल्यातील मुक्तिभूमी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दि. १३ ऑक्टोबर रोजी १३ व्या मुक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात व्याख्याने, कार्यशाळा, करिअर मार्गदर्शन, मुक्ती काव्य-गीत, शाहिरी जलसा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मुक्ती महोत्सवाचे मुख्य प्रवर्तक शरद शेजवळ यांनी दिली.

मुक्ती महोत्सव उद्घाटन शुक्रवारी (दि. ७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, येवलाचे अध्यक्ष प्रकाश वाघ यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश खळे, विकास वाहुळ, सविता धिवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळा सकाळी १०.३० वा. अनु. जाती, नवबौद्ध मुलांची निवासी शाळा, बाभूळगाव येथे होईल. सोमवारी (दि. ९) करिअरच्या संधी आणि तयारी या विषयावर प्रा. शैलेंद्र पंडोरे, हरेश बनसोडे यांचे व्याख्यान सायंकाळी ६.०० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह,

बाभूळगाव येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी संविधान सभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान व भारतीय लोक या विषयावर कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स ग्रंथाचे संपादक प्रा. देवीदास घोडेस्वार व प्रा. महेंद्र गायकवाड ( संयोजक, संविधान साक्षरता संवर्धन अभियान ) हे गुंफणार आहेत. आदिवासी मुलांचे वसतिगृह, बाभूळगाव येथे हे व्याख्यान सायंकाळी ६.३० वाजता दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सर्वरोगनिदान व रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य व ग्रंथदान संकलन उपक्रम, सामाजिक प्रबोधन गीतागायनाचा कार्यक्रम मुक्ती पहाट, आंबेडकरी शाहिरी जलसा, मुक्ती काव्य गीतगायन कार्यक्रम सादरकर्ते

लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक नाशिक हे करणार आहे. पहाटे ५.४५ पासून दिवसभर मुक्तिभूमी, येवला येथे हे कार्यक्रम पडतील..

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद पानपाटील, हिरामण मेश्राम, सुनील वाघ, राजरत्न वाहुळ, मयूर सोनवणे, मिलिंद गुंजाळ, विश्वास जाधव, बाबासाहेब गोविंद, विकास वाहुळ, अझर शाह, सिद्धार्थ गुंजाळ, अशोक पगारे, संकेत गुंजाळ, साबूर मोमीन, मयूर सोनवणे, डॉ. भाऊसाहेब कदार, जयश्री सदाफळ, मनोज गुंजाळ, ललित भांबेरे, सुमित गरुड, समाधान निकाळे, राजू गरुड, पवन दळे, प्रदीप पगारे, गिरीश पाटील, रोहित गायकवाड हे प्रयत्नशील आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!