ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यात साकोरा गावात जातीयवादी गावगुंडाचा धुमाकुळ, बौध्द तरुणावर जीवघेणा हल्ला, रिपाई व ऐपीआय वतीने कैलासभाई पगारे यांचा आदोंलनाचा इशारा,

नांदगाव तालुक्यात साकोरा गावात जातीयवादी गावगुंडाचा धुमाकुळ, बौध्द तरुणावर जीवघेणा हल्ला, रिपाई व ऐपीआय वतीने कैलासभाई पगारे यांचा आदोंलनाचा इशारा, नाशिक शांताराम दुनबळे नाशिक-:नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील साकोरा या गावात जातीयवादी गावगुंडाकडून बौध्द तरुणावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे
येथील अमोल दौलत निकम हा मोल मजुरी करणाऱ्या तरुणास तू माझे दुकान सोडून दुसऱ्याकडे का कामाला गेलास? साल्या महारड्या शेवटी तू जातीवरच गेलास असे म्हणत श्री अशोक बाळासाहेब बोरसे या जातियवादी गावगुंडांनी मारहाण केली , त्यावेळी त्याचा मुलगा अनिकेत अशोक बोरसे याने लोखंडी गज आणून दिला तेव्हा त्या गजाने अमोल निकम या बौध्द तरुणाच्या डोक्यात वार करून तो मेला असे समजून काही मदतीला धावलेल्या लोकांना एक महार मारलाय तुम्हालाही मरायच आहे का तुम्हाला दाखवतो पाटलाचा हिसका असे म्हणून निघून गेला . त्यावेळी काही बौध्द तरुणांनी त्याच्या नातेवाईकांना फोन केला तेव्हा ते मळ्यातून आल्यावर त्यांनी त्यास नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले , तेथून सदर तरुण बेशुद्ध अवस्थेतच असल्याने त्याची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी मालेगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवलेआसुन पोलिसांनी अद्याप पर्यंत कुणावरही कारवाई केली नाही त्यामुळे इतका गंभीर प्रकार घडला असूनही पोलिस काहीच कारवाई करत नसल्याने ते आरोपींना पाठीशी तर घालत नाहीना अशी सामान्य नागरिकांच्या मनात शंका उत्पन्न झाली आहे.त्यावेळी रीपाई नेते कैलासभाई पगारे यांनी नांदगाव पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना सबंधित जातीवादी गावगुंड अशोक बोरसे याच्यावर अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३(१) , कलम३(१)s तसेच भा. द.वी.कलम ३०७, ३२६,३०५,३०६, अंतर्गत त्वरित कारवाई करून त्याला त्वरित अटक करा अशी मागणी केली असून कारवाई न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला असून त्यावेळी रिपाई नेत्या जयश्रीताई वाघ, सचिन वाघ,मालेगाव युवा शहर अध्यक्ष सुशील भाऊ उशिरे , बिपिन निकम, दतू निकम , भाऊसाहेब निकम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!