ताज्या घडामोडी

जळगाव शहरात बनावट मुद्देमालावर एमआयडीसी पोलीसांची धाड

विषय :- जळगाव शहरात बनावट मुद्देमालावर एमआयडीसी पोलीसांची धाड

दिनांक 12/09/2023 रोजी सिध्देश सुभाष शिर्के वय-३१ वर्षे व्यवसाय नोकरी ४/४. ईस्टेट नगर, जोगेश्वरी पूर्व मुंबई हे नेत्रीका कन्सल्टींग इंडीया प्रायव्हेट लिमीटेड शाखा गोरेगाव इस्ट मुंबई फिस्ट ऑफिसर म्हणून कर्तव्यास असून त्यांना Emami limited, haleon uk ip limeted, hindustan uniliver. reckitt benekiser.sable_waghire and company या कंपन्यांनी त्यांच्या कंपनीत तयार होणा-या प्रोडक्ट सारखे बनावटीकरण करून विकणाऱ्या लोकांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबतचे अधिकार दिले आहे. सिध्देश सुभाष शिर्के व त्यांच्या टिमला माहीती मिळाली कि. जळगाव जिल्हयात शिरसोली नाका मोहाडी रोड नेहरू नगर येथे राहणारा जयप्रकाश नारायणदास दारा व गायत्री नगर येथे राहणारा आकाश राजकुमार बालानी हे वरील नमुद कंपनीच्या ओरीजनल प्रोडक्ट सारखे दुसरे प्रोडक्ट बनावटीकरण करन विक्री करीत आहेत अशी माहीती मिळाल्याने सदर इसमांवर कार्यवाही करण्यासाठी त्यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार यांना भेटुन मा. पोलीस अधिक्षक सो एम राजकुमार यांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना कायदेशीर मदत व कारवाई करण्याबाबत सांगीतल्याने मा. पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांनी पथक तयार करुन सोबत नेत्रीका कन्सल्टींग इंडीया प्रा लि कंपनीचे सहकारी यांना सोबत घेवुन जयप्रकाश नारायणदास दारा व गायत्री नगर जळगाव येथे राहणारे आकाश राजकुमार बालानी यांना ताब्यात घेवुन त्यांचे चारचाकि वाहनांची झडती घेतली असता जयप्रकाश नारायणदास दारा यांचे कडे असलेल्या 3,00,000/- रुपये किंमतीच्या टाटा इन्ट्रा कंपनीच्या मालवाहू गाडीमध्ये 338,000/- रुपये किंमतीचा त्यात ENO sixer, झंडु बामच्या बाटल्या, आयोडेक्सच्या बाटल्या, हार्षीक पॉवर प्लसच्या बाटल्या, डेटॉल साबन, डव शैपुचे पाऊच, सर्फ एक्सलचे पाऊच नकली बनावटीकरण केलेले साहीत्य मिळून आले.

तसेच आकाश राजकुमार बालानी यांच्या कडे असलेल्या चारचाकि ओमणी या वाहनात 14745 रुपये किंमतीची ENO sixer, झंडु बामच्या बाटल्या, आयोडेक्सच्या बाटल्या, हार्षीक पॉवर प्लसच्या बाटल्या, डेटॉल साबन, डव शैपुचे पाऊच, सर्फ एक्सलचे पाऊच नकली बनावटीकरण केलेले साहीत्य मिळुन आले.

जयप्रकाश नारायणदास दारा व गायत्री नगर जळगाव येथे राहणारे आकाश राजकुमार बालानी यांचेकडुन एकुण 7,05,745/- रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. फिर्यादी सिध्देश सुभाष शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी यांचेविरुध्द भादवी कलम 420 व कॉपी राईट अॅक्ट कलम 51(अ) (ब) 63.64 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री एम राजकुमार सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, संदीप गावीत सो. यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनी दिपक जगदाळे, सफो अतुल वंजारी, पोहेका रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचीन मुंढे, पोना. योगेश बारी, सचीन पाटील, पोका, विशाल कोळी, राहुल रगडे, छगन तायडे, मपोका. राजश्री बावीस्कर अशांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउनी दिपक जगदाळे हे करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!