ताज्या घडामोडी

येवल्यात भगवान चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सवाचे आयोजन* *मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती*

*येवल्यात भगवान चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सवाचे आयोजन*

*मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती*

*नाशिक,येवला,दि.१६ सप्टेंबर :-* महानुभव पंथ संस्थापक युगप्रवर्तक भगवान चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने येवल्यात दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा महानुभव समिती व येवला तालुका महानुभव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

भगवान चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने दोन दिवसीय महोत्सवात विविध संत महात्मे, नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. येवला शहरातील माऊली लॉन्स येथे दि.२३ सप्टेंबर व २४ सप्टेंबर रोजी हा धर्मसभा व ज्ञानयज्ञ सोहळा पार पडणार आहे. शनिवार दि.२३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत श्रीमूर्तीची संत महंतासह येवला शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. रात्री ७ ते ८.३० वाजता भागवताचार्य प.पु.चिरडे बाबा यांचे प्रवचन होणार असून ९ वाजता महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.

रविवार दि.२४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर सकाळी १० ते १२ वाजता धर्मसभा व ज्ञानयज्ञ सोहळा पार पडणार असून या सोहळ्यास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या सभाध्यक्षपदी अखिल भारतीय महानुभव परिषदेचे कार्याध्यक्ष कवीश्वर कुलभूषण प.पु.श्री.विध्वांस बाबा, कार्याध्यक्ष प.पु.पूजदेकर बाबा, कार्यक्रमाचे अध्यक्ष प.पु.सुकेणकर बाबा, स्वागताध्यक्ष प.पु.श्री. चिरडेबाबा, प्रमुख वत्के प.पु.श्री.संतोषमुनी शास्त्री कपाटे, प.पु.श्री कानळसकर बाबा असणार आहे.

या दोन दिवसीय महोत्सवात महानुभव पंथातील महंत व अनुयायी उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यास तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक जिल्हा महानुभव समिती व येवला तालुका महानुभव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!