ताज्या घडामोडी

फरार आरोपी पोलीसांच्या जाळयात.

एमआयडीसी पोस्टे, जळगाव दिनांक 09/09/2023

जळगाव

– फरार आरोपी पोलीसांच्या जाळयात.

दिनांक 05/04/2023 रोजी विशाल राजु अहीरे, आशुतोष सुरेश मोरे दिक्षांत देविदास सपकाळे, शुभम भिकन चव्हाण, गोपाल सिताराम चौधरी सर्व स रामेश्वर कॉलनी परीसर असे मेहरूण बगीच्या जवळ रात्री 10.00 वा च्या सुमारास अंधारात काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत ची माहीती एमआयडीसी पोलीसांना मिळाली होती. त्याप्रमाणे सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला होता त्यावेळी आशुतोष सुरेश मोरे हा गावठी कट्टयासह मिळुन आला होता ईतर सर्व पळुन गेले होते. त्यात विशाल राजु अहीरे हा सुध्दा गुन्हा घडला दिवसापासुन फरार होता.

या दरम्यान मा. पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, सुमारे 05 महीण्यांपासून फरार असलेला सदर गुन्हयात पाहीजे असलेला विशाल राजु अहीरे हा रेल्वे ने जळगाव येथे येत आहे अशा खात्रीशीर बातमी मिळाल्याने जळगाव रेल्वे स्टेशन येथुन स्यास पोउनी दिपक जगदाळे, सफो अतुल वंजारी, पोना, सुधीर सावळे. इमरान सैय्यद, योगेश बारी, पोका साईनाथ मुंडे अशानी रेल्वे स्टेशन मधुन बाहेर पडत असतांना ताब्यात घेतले होते व त्यास अटक करण्यात आली असुन त्याला न्यायमुर्ती श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांचे न्यायालया हजर केले असता त्याला 04 दिवसांची पोलीस कस्टडी रीमांड देण्यात आली आहे. त्याचेवर यापूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे 07. शनीपेठ येथे 01 गुन्हा दाखल आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!