ताज्या घडामोडी

डी पॉल स्कूलमध्ये कार्यक्रमांद्वारे भारतातील धर्मनिरपेक्षता प्रदर्शित करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

डी पॉल स्कूलमध्ये कार्यक्रमांद्वारे भारतातील धर्मनिरपेक्षता प्रदर्शित करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सचिन वखारे, येवला.
येथील डिपॉल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ. राजीव चंडालिया व डॉ.पायल चंडालिया यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.कार्यक्रमाला विविध धर्मांचे प्रतिनिधी म्हणून स्वामी अविनाश अनाद आनंदजी, मौलाना शेख अब्दुल्ला अश्फाक, भन्तिजी भारद्वाज, रणजीत सिंग खरा, ब्रह्माकुमारी नीता दीदी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅथ्यू, उपमुख्याध्यापक फादर ऑगस्टिन, सिस्टर हेमिमा, सिस्टर जोजी,सिस्टर वेलांगणी ,शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. पूनम देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रार्थना नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्रीडा शिक्षक यशवणी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करत ध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. शाळेतील चार हाऊस मध्ये धर्मनिरपेक्षतेवर आधारित माईम सादरीकरणाची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये रेड हाऊस पहिल्या तर ब्लू हाऊस दुसऱ्या क्रमांकाने विजयी ठरले. सौ.नेहा गुजराती यांनी परीक्षण केले.यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी चढाओढ करत आपले नैपुण्य दाखवले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी पूनम देशपांडे आणि आनंद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य सादर केले.कार्यक्रमाचे संयोजन पुनम देशपांडे, जिल्स झेवियर, किशोर सपकाळ आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोरख बोरसे, दत्तात्रय भड, गणेश गोरडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थिनी कामाक्षी गुजराती आणि झेनब लकडावाला यांनी सूत्र संचालन केले व किशोर सपकाळ यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!