ताज्या घडामोडी

*एम.एस.जी.एस. शिक्षण संकुलात स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन साजरा.*

*एम.एस.जी.एस. शिक्षण संकुलात स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन साजरा.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शिक्षण संकुलात स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उमा राजेंद्र कोटमे (पोलिस उपनिरीक्षक) व श्रद्धा साहेबराव वैद्य (पोलिस उपनिरीक्षक) हे होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात झेंडावंदन करून करण्यात आली त्यानंतर सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व झेंडागीतचे गायन केले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहकार व शिक्षण महर्षी गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.त्यानंतर अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले.विविध स्पर्धेत बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या व त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम , सेमी इंग्लिश मिडीयम व ज्यू.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर नृत्य, गायन, नाटक इ. सादर केले.कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे संचालक राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणात सर्वांना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, संचालक डॉ.भागीनाथ जाधव, उज्ज्वल जाधव, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, रामनाथ काका एंडाईत, संदीप वाकचौरे, भागीनाथ थोरात, कचरू पाटील गवळी, मारुती वाकचौरे, अशोक एंडाईत, साहेबराव आहेर, द्वारकानाथ सोनवणे, अतुल गाडे, आकाश सोनवणे, मालनबाई सोळसे, निलेश आहेर,मंगेश शिंदे, प्रिंसिपल अल्ताफ खान, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्राचार्य सचिन सोनवणे, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अजीम पटेल, अविनाश बोडारे, सचिन घोडके, पारस भगत, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, सुनील सपकाळ, संदीप बोढरे, सचिन बोढरे, जितेश व्यवहारे, शिवनाथ शिरसाठ, सुषमा सोनवणे, सुवर्णा कडलग, कांचन गायकवाड सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती खैरनार व अनुष्का देशमुख यांनी केले तर आभार शिक्षक अमोल आहेर यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!