ताज्या घडामोडी

नांदगाव -मनमाड मराठी पत्रकार संघा तर्फे हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

नांदगाव -मनमाड मराठी पत्रकार संघा तर्फे हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

नांदगाव तालुका प्रतिनिधी आफरोज अत्तार

मनमाड प्रतिनिधी ता. १४ : पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकत्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार सरळसरळ लोकशाही स्वातंत्र्यावर घाला असून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार असून या हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना निवेदन देवून पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

राज्य आणि देशभरात वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम सुरू असून पत्रकारांवर हल्ले वाढलेले आहेत. पत्रकार अतिशय असुरक्षित वातावरणामध्ये काम करत आहे. अनेकांना दबावाखाली काम करावे लागते आहे. ही परिस्थिती वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी आणि निकोप लोकशाहीसाठी घातक असून आम्ही सारे पत्रकार या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहोत. हा सरळसरळ लोकशाही स्वातंत्र्यावर घाला असून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार आहे. पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकत्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींना तात्काळ अटक करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना संरक्षण मिळावे, पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करावी अशी मागणी पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे, जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी, नरेश गुजराथी, सरचिटणीस
संदीप जेजुरकर, कोषाध्यक्ष निलेश वाघ, अशोक बिदरी, तुपार गोयल, उपाली परदेशी, सॅमसन आव्हाड, गणेश केदारे, अफरोज अत्तार, आनंद बोथरा, नरहरी उंबरे, सतीश शेकदार, संदीप देशपांडे, नाना आहिरे, योगेश म्हस्के, अनित शेख

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!