ताज्या घडामोडी

हरणुल येथील वीरगती प्राप्त गणेश चव्हाण अनंतात विलीन*

*हरणुल येथील वीरगती प्राप्त गणेश चव्हाण अनंतात विलीन*
पोलिस टाईम्स न्युज/ सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड*: तालुक्यातील गणेश(विकी) अरुण चव्हाण महार रेजिमेंट पूंछ राजुरी येथे सैन्यात कार्यरत असताना कुस्ती प्रशिक्षण दरम्यान तब्येत बिघडल्यामुळे त्याला ऊपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यानच त्यास वीरगती प्राप्त झाली.

गणेश चव्हाण या जवानाचे पार्थिव आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान चांदवड टोल नाक्यापर्यंत पोहोचले. या ठिकाणाहून एका सजवलेल्या लष्कराच्या गाडीत त्याचे पार्थिव ठेवण्यात आले व तेथूनच पार्थिव चांदवड पेट्रोल पंप, बस स्टँड मार्गे हरणुल या ठिकाणी शहीद गणेश चव्हाण यांच्या घरी नेण्यात आले.

पार्थिव घरी येताच घरातील व्यक्ती, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी एकच मोठा हंबरडा फोडला या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांच्या डोळ्यांमधून अश्रू धारा वाहू लागल्या. काही वेळाने सदर पार्थिव परत मिरवणूकीने हरनुल गावाकडे आणण्यात येऊन गावाजवळच मोकळ्या जागेत अंत्यविधीसाठी नेण्यात आले.

शहिदाच्या अंत्यविधीसाठी हरणुल ग्रामपंचायत ने संपूर्ण व्यवस्था गावाजवळीलच मोकळ्या जागेत होती. प्रशासनाच्या वतीने वीरगती प्राप्त झालेल्या जवानास यावेळी पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
यावेळी पोलीस प्रशासनातर्फे चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी मानवंदना दिली. त्याचप्रमाणे लष्करी सैनिकांच्या वतीने सुद्धा मानवंदना देण्यात आली यावेळी तीन राऊंड फायर करण्यात आले.

शहीद गणेश चव्हाण याला अखेरचा निरोप देण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नेतेमंडळी तसेच अबाल वृद्ध, माता भगिनी, व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या वतीने केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार, चांदवड तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर, माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल, डॉक्टर आत्माराम कुंभार्डे, डॉक्टर सयाजीराव गायकवाड, संजय जाधव, नवनाथ आहेर, उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांचे सह तालुक्यातील निवृत्त सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी “गणेश चव्हाण अमर रहे”, “भारत माता की जय”,” वंदे मातरम” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
वीरगती प्राप्त झालेल्या गणेश चव्हाण यांच्या लहान भावाने त्यास अग्नीडाग देऊन अंत्यसंस्कार केले या ठिकाणी गणेशच्या मातेच्या अवस्थेने संपूर्ण परिसरच हळहळला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!